• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अंबाजोगाई आरटीओ कार्यालयाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १५ कोटींची मंजुरी; आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
अंबाजोगाई आरटीओ कार्यालयाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी १५ कोटींची मंजुरी; आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – अंबाजोगाई येथील उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाच्या विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने १४ कोटी ९९ लाख ७५ हजार ४०६ रुपयांच्या निधीस प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली असून, या दुसऱ्या टप्प्यामुळे कार्यालयाच्या विकासाला गती मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील इमारत बांधकाम पूर्ण होऊन सध्या त्या ठिकाणी नियमित कामकाज सुरू असताना, आता नव्या मंजुरीमुळे पुढील विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.

केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाल्याचे सांगितले जात आहे. माजी आरोग्यमंत्री स्वर्गीय विमलताई मुंदडा यांनी अंबाजोगाई येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करून आणल्याने अंबाजोगाईसह आसपासच्या सहा तालुक्यांतील वाहनधारकांची मोठी सोय झाली होती. सुरुवातीला भाड्याच्या जागेत सुरू असलेले हे कार्यालय आता स्वतःच्या सुसज्ज इमारतीत स्थलांतरित झाले आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

नव्या मंजुरीनुसार, इमारतीचा स्टिल्ट फ्लोअर आणि पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यात येणार असून, त्यामध्ये फर्निचर, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, विद्युतीकरण तसेच सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्याचा समावेश आहे. यासोबतच सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत, अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ते, वाहनतळ शेड आणि मुख्य प्रवेशद्वारासाठी पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे. दिव्यांगांसाठी रॅम्प व लिफ्ट सुविधा तसेच पर्यावरणपूरक उपाय म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सोलर रूफटॉप यंत्रणाही उभारण्यात येणार आहे.

दरम्यान, हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Previous Post

पात्र लाभार्थ्यांना द्या शेतकरी कार्डचा लाभ; अन्यथा आंदोलनाचा इशारा – राणा चव्हाण

Next Post

राम कुलकर्णी यांची भाजपा राज्य प्रवक्तेपदी फेरनिवड; सर्वस्तरांतून स्वागत

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
12
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
राम कुलकर्णी यांची भाजपा राज्य प्रवक्तेपदी फेरनिवड; सर्वस्तरांतून स्वागत

राम कुलकर्णी यांची भाजपा राज्य प्रवक्तेपदी फेरनिवड; सर्वस्तरांतून स्वागत

ताज्या बातम्या

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In