• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिद्द आणि चिकाटीचा विजय: शेतमजुराचा मुलगा बनला ‘आदर्श शिक्षक’

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
जिद्द आणि चिकाटीचा विजय: शेतमजुराचा मुलगा बनला ‘आदर्श शिक्षक’
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

एरंडोल (प्रतिनिधी) – कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतीही अडचण पार करता येते, याचे जिवंत उदाहरण जळगाव जिल्ह्यातील योगेश महाजन यांनी घालून दिले आहे. अत्यंत साध्या शेतमजूर कुटुंबातून आलेल्या योगेश महाजन यांनी शिक्षणाच्या बळावर यशाचे शिखर गाठत ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ पटकावला आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत असून सर्वत्र त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

योगेश महाजन यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. वडील शेतमजुरी करून संसार चालवत असताना अनेक आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी स्वतःच्या प्रगतीसोबतच इतर विद्यार्थ्यांनाही घडवण्याचा संकल्प केला. सुरुवातीला लहान स्तरावर सुरू केलेले त्यांचे शैक्षणिक कार्य आज मोठ्या प्रमाणावर विस्तारले आहे.

RelatedPosts

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘श्री क्लासेस’मधून शालेय व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दिले जाते, ‘शीतल अकॅडमी’मधून ग्रामीण विद्यार्थ्यांचा इंग्रजीबाबतचा न्यूनगंड दूर केला जातो, तर ‘श्री नेक्स्टजेन कॉम्प्युटर्स’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणक साक्षरतेचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या या उपक्रमांमुळे अनेक विद्यार्थ्यांना दिशा मिळत असून ते सक्षम होत आहेत.

त्यांच्या निस्वार्थ शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. “हा पुरस्कार माझ्या आई-वडिलांच्या कष्टांचा आणि विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थी सक्षम व्हावा, हेच माझे ध्येय आहे,” असे मनोगत योगेश महाजन यांनी व्यक्त केले.

आजच्या काळात अनेक तरुण अडचणींचा बाऊ करतात; मात्र योगेश महाजन यांनी प्रतिकूल परिस्थितीतही यश मिळवत एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्यामुळे ते तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत असून, “जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही,” हा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एरंडोल येथे शीतपेय वाटप; विक्की खोकरे यांचा स्तुत्य उपक्रम

Next Post

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शीतपेय वाटप….

Related Posts

ताज्या घडामोडी

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
12
ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
7
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
16
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
4
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
93
Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एरंडोल येथे शीतपेय वाटप; विक्की खोकरे यांचा स्तुत्य उपक्रम

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शीतपेय वाटप....

ताज्या बातम्या

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

देवधरी घाटात अपघातग्रस्त वाहनातील ३ टन मिरची उतरवून देवा ग्रुपच्या कार्यकर्त्यांची मदत

September 5, 2026
एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

एसएफआय व डिवायएफआयतर्फे शहादा येथे विविध मागण्यांसाठी निदर्शने आणि निवेदन.

September 5, 2026

अडोळ धरणातील पाणी शेतीसाठी उपसा तात्पुरता थांबवण्याची मागणी

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In