• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेलमध्ये उभ्या ट्रकला रिक्षाची धडक; भीषण अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
पनवेलमध्ये उभ्या ट्रकला रिक्षाची धडक; भीषण अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू
0
SHARES
13
VIEWS
Ad 1
Ad 1

पनवेल | प्रतिनिधी

वाहनातील डिझेल संपल्याने कोणतीही पार्किंग लाईट अथवा इशारा न देता रस्त्यात उभ्या केलेल्या ट्रकला पाठीमागून रिक्षाची जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी रात्री जुना पुणे-बेंगळूर महामार्गावरील आजीवली ब्रिजजवळ, कोनगाव येथे पुणे लेनवर ही दुर्दैवी घटना घडली.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मोरेश्वर अनंता सोनावळे (रा. ठोंबरेवाडी, पोयंजे) असे मृत रिक्षाचालकाचे नाव असून, त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी निष्काळजीपणे ट्रक रस्त्यात उभा करणाऱ्या चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रक चालकाच्या वाहनातील डिझेल अचानक संपल्याने त्याने ट्रक जुना पुणे-बेंगळूर महामार्गावरील आजीवली ब्रिजजवळ रस्त्याच्या मधोमध उभा केला होता. मात्र, रात्रीच्या वेळी मागून येणाऱ्या वाहनांना ट्रक दिसावा यासाठी आवश्यक असलेली पार्किंग लाईट, रिफ्लेक्टर किंवा कोणताही धोक्याचा इशारा देणारी व्यवस्था करण्यात आली नव्हती.

दरम्यान, रिक्षाचालक मोरेश्वर सोनावळे हे आपल्या रिक्षासह त्या मार्गावरून जात असताना अंधारामुळे त्यांना रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांची रिक्षा भरधाव वेगात ट्रकच्या मागील भागावर आदळली. धडक इतकी भीषण होती की, सोनावळे यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी रिक्षाचालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, रस्त्यावर धोकादायकरित्या वाहन उभे करून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पनवेल तालुका पोलीस करत आहेत.

या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रात्रीच्या वेळी रस्त्यावर बेजबाबदारपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Ad 1
Tags: Shrinath Laad
Previous Post

नवी मुंबई आणि खालापूरला मिळणार जागतिक ओळख; महाराष्ट्रात उभारले जाणार देशातील सर्वात मोठे ‘डेटा सेंटर हब’

Next Post

सेलू शहरात अवकाळी पाऊस व तुफानी वाऱ्याने मोठे नुकसान

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
सेलू शहरात अवकाळी पाऊस व तुफानी वाऱ्याने मोठे नुकसान

सेलू शहरात अवकाळी पाऊस व तुफानी वाऱ्याने मोठे नुकसान

ताज्या बातम्या

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

मायणी गावाच्या समृद्ध इतिहासाला पुस्तकातून उजाळा

October 11, 2026
सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

सप्तशृंगी गडावरून देवीची ज्योत घेऊन निवाणे ग्रामस्थांची पायी दिंडी उत्साहात

October 11, 2026
🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In