कन्हेरवाडी | प्रतिनिधी : जयराम फड
कन्हेरवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य भागवत कथा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. 7 जून 2026 रोजी या धार्मिक महोत्सवाला प्रारंभ होणार असून शनिवार, दि. 13 जून 2026 रोजी महोत्सवाची सांगता होणार आहे.
या सात दिवसीय महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दररोज नामस्मरण, भागवत कथा, भजन तसेच विविध कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार आहे.
महोत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त ह.भ.प. अर्जुन महाराज लाड यांचे विशेष कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. त्यांच्या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
महोत्सव समितीच्या वतीने पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना या भागवत कथा व कीर्तन महोत्सवात सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचे जतन करणाऱ्या या महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.









