• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

यशदा येथे पथारी व्यवसायिकांच्या सक्षमीकरणासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

Rudra by Rudra
May 30, 2026
in ताज्या घडामोडी
0
यशदा येथे पथारी व्यवसायिकांच्या सक्षमीकरणासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
0
SHARES
161
VIEWS
Ad 1
Ad 1

यशदा येथे पथारी व्यवसायिकांच्या सक्षमीकरणासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
पथारी व्यवसायिकांच्या सर्वांगीण विकास, सक्षमीकरण आणी भविष्यातील धोरणात्मक नियोजनाच्या उद्देशाने महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, पर्यावरण शिक्षण केंद्र आणि प्रयास हेल्थ ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने यशदा येथे सर्व
पथ विक्रेता सदस्य (TVC) तसेच पथारी व्यवसायिकांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.सदर कार्यशाळेमध्ये पथारी व्यवसायिकांच्या हक्क, कर्तव्ये, आरोग्य, शहरी नियोजन, व्यवसाय व्यवस्थापन, सामाजिक सुरक्षा, तसेच भविष्यातील विकासात्मक संधी अशा विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात आली. सहभागी सदस्यांनी आपले अनुभव, सूचना आणि अपेक्षा मांडत विधायक संवाद साधला…

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

कार्यशाळेचे नियोजन, मार्गदर्शन आणि विषयांची परिणामकारक मांडणी यामध्ये संस्थेच्या विनीता ताई, नितीन पवार सर, विजया जोरी, डॉ. संस्कृती मेमन, डॉ. अविनाश मधाळे, अवधूत अभ्यंकर, कुणाल जैस्वाल आणि मंगेश निकम यांनी महत्त्वपूर्ण योगदान देऊन कार्यशाळेला उत्कृष्ट स्वरूप प्रदान केले.
TVC सदस्य श्री. गजानन पवार, श्री.मंदार धुमाळ, श्री. राकेश गायकवाड, श्री.संजय चंदेरे ,श्री दत्तात्रेय सोंडेकर,तसेच पिंपरी चिंचवड, राजगुरुनगर, आणी ईतर महानगर पालिका, नगर पालिका, नगर परिषद येथील TVC सदस्य तसेच व्यवसायिक यावेळी उपस्थित होते.
कार्यशाळेतील प्रमुख आकर्षण म्हणजे महाराष्ट्र हॉकर फेडरेशन यांनी तयार केलेल्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक प्रस्तावांवर झालेली सविस्तर चर्चा. या योजनांवर संस्था प्रतिनिधी, TVC सदस्य आणि पथारी व्यवसायिक यांच्यात सकारात्मक व विधायक विचारविनिमय झाला. चर्चेदरम्यान प्राप्त झालेल्या सूचना, अभिप्राय आणि स्थानिक गरजांचा विचार करून संबंधित योजनांमध्ये आवश्यक ते बदल व सुधारणा करण्याबाबत एकमत झाले.

येत्या काळात पथारी व्यवसायिकांच्या विकासासाठी, कौशल्यवृद्धीसाठी आणि संघटनात्मक बळकटीकरणासाठी अशाच स्वरूपातील अनेक अभ्यासपूर्ण सत्रे, कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
तसेच संस्था आणि TVC सदस्य यांच्यामध्ये प्रभावी समन्वय साधून सर्व घटकांना एका व्यासपीठावर आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल नीलम अय्यर ताई आणि कमल जगधने ताई यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.TVC सदस्य सागर दहीभाते यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यशाळा पथारी व्यवसायिकांच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण आणि दीर्घकालीन उपाययोजना विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली असून, भविष्यात अधिक सक्षम, संघटित आणि शाश्वत पथारी व्यवसाय व्यवस्थेच्या निर्मितीसाठी ही कार्यशाळा निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

Ad 1
Previous Post

रामाप्पा चिवडशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

Next Post

उत्तर मुंबई धनगर समाज समितीमार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
11
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
3
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
26
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
उत्तर मुंबई धनगर समाज समितीमार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन

उत्तर मुंबई धनगर समाज समितीमार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्या

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

‘आत्मा’ अंतर्गत सेवा संकल्प अभियानाची गावोगावी धूम; शहापूर तालुक्यात ‘महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियमा’ अंतर्गत ५ हजारांवर ऑनलाईन अर्ज दाखल

October 12, 2026
भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

भारत सरकारचे राष्ट्रपती पदक वितरण समारंभ

October 12, 2026
वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

वडूज येथील उपविभागीय पोलीस कार्यालयासमोर आजोबांना न्याय द्या म्हणत कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न व कार्यालयासमोर आंदोलन.

October 12, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In