• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सांवगी मेघे पोलिसांची दमदार कारवाई; २.८५ लाख रुपयांचे २,७३० लिटर डिझेल-पेट्रोल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
सांवगी मेघे पोलिसांची दमदार कारवाई; २.८५ लाख रुपयांचे २,७३० लिटर डिझेल-पेट्रोल जप्त
0
SHARES
34
VIEWS
Ad 1

वर्धा | प्रतिनिधी :

वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई करत दहेगाव स्टेशन शिवारातून संशयास्पदरीत्या साठवून ठेवलेले तब्बल २,७३० लिटर डिझेल व पेट्रोल जप्त केले आहे. या कारवाईत २ लाख ८५ हजार ७५९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

पोलिसांना दि. ३० मे २०२६ रोजी मौजा दहेगाव स्टेशन शिवारात काही व्यक्तींची संशयास्पद हालचाल सुरू असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत सावंगी मेघे पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. यावेळी जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनाही सोबत घेण्यात आले.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी परिसराची तपासणी केली असता काळ्या व निळ्या रंगाच्या प्लास्टिक कॅनमध्ये मोठ्या प्रमाणावर इंधन साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान ५४ प्लास्टिक कॅनमध्ये अंदाजे १,६२० लिटर डिझेल आणि ३७ प्लास्टिक कॅनमध्ये अंदाजे १,११० लिटर पेट्रोल आढळले. अशाप्रकारे एकूण २,७३० लिटर इंधन जप्त करण्यात आले.

पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला. जप्त करण्यात आलेल्या डिझेल व पेट्रोलची अंदाजे किंमत २,८५,७५९ रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध सावंगी मेघे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. इंधनाचा साठा कोणत्या उद्देशाने करण्यात आला होता, त्यामागे कोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई सौरभकुमार अग्रवाल, सदाशिव वाघमारे आणि प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोलीस उपनिरीक्षक सतीश दुधाने, सहाय्यक फौजदार शरद मुन, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन भगत, संजय पंचभाई, चालक पोलीस अंमलदार आकाश गोरे, सुमित राठोड तसेच चालक महिला पोलीस अंमलदार अंजली गडेकर यांनी सहभाग घेतला.

सांवगी मेघे पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध इंधन साठवणूक व काळाबाजार करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा बेकायदेशीर प्रकारांविरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Tags: Shankar Panbude
Previous Post

संघाला समतायुक्त, शोषणमुक्त समरस हिंदू समाज घडवायचा आहे – बाळासाहेब चौधरी

Next Post

कारंजा तालुक्यातील गारपीट येथे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांचा रात्रीचा मुक्काम; ग्रामस्थांशी साधला थेट संवाद

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
14
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
11
Next Post
कारंजा तालुक्यातील गारपीट येथे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांचा रात्रीचा मुक्काम; ग्रामस्थांशी साधला थेट संवाद

कारंजा तालुक्यातील गारपीट येथे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांचा रात्रीचा मुक्काम; ग्रामस्थांशी साधला थेट संवाद

ताज्या बातम्या

साने गुरुजी विद्यालयात आनापान साधना वर्ग व राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न……….

August 30, 2026

पावसाच्या लहरीपणाचा फटका, शेतकऱ्यांच्या पिकांना…

August 30, 2026
ग्रामसभा चटवाबोडचा श्रमदानातून वृक्ष लागवडीचा उपक्रम*

ग्रामसभा चटवाबोडचा श्रमदानातून वृक्ष लागवडीचा उपक्रम*

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In