• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गडचिरोलीच्या कन्येने अमेरिकेत रोवला यशाचा झेंडा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
गडचिरोलीच्या कन्येने अमेरिकेत रोवला यशाचा झेंडा
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

कु. आम्रपाली खंडारे यांना न्यूयॉर्क विद्यापीठाची ‘मास्टर्स इन मेकॅट्रॉनिक्स अँड रोबोटिक्स’ पदवी

गोंडपिंपरी | प्रतिनिधी

गडचिरोली जिल्ह्यातील रामनगर येथील रहिवासी तथा नागपूर शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदकुमार तुळशीराम खंडारे यांची कन्या कु. आम्रपाली आनंदकुमार खंडारे हिने अमेरिकेतील प्रतिष्ठित New York University मधून “मास्टर्स इन मेकॅट्रॉनिक्स अँड रोबोटिक्स प्रोग्राम” यशस्वीरित्या पूर्ण करून गडचिरोली जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

आम्रपालीचे प्राथमिक शिक्षण गडचिरोली येथील कार्मेल हायस्कूलमध्ये झाले. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणादरम्यान तिने उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी केली. सन 2015 मध्ये सीबीएसई दहावीच्या परीक्षेत तिने 93.01 टक्के गुण मिळविले. त्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षण नागपूर येथील सेंट पॉल ज्युनियर सायन्स कॉलेजमध्ये पूर्ण करत सन 2017 मध्ये बारावीच्या परीक्षेत 88 टक्के गुण संपादन केले.

पुढे जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या बळावर तिने जेईई परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत नागपूर येथील Visvesvaraya National Institute of Technology मध्ये प्रवेश मिळवला. तेथे तिने इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शाखेत बी.टेक. पदवी संपादन केली. शिक्षणादरम्यान तिने रोबोटिक्स तंत्रज्ञानाशी संबंधित विविध प्रकल्पांमध्ये सहभाग घेत प्रशिक्षणही प्राप्त केले.

बी.टेक. पूर्ण झाल्यानंतर बेंगळुरूमधील एका रोबोटिक्स तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत असतानाच तिने उच्च शिक्षणाचे स्वप्न जपले. परदेशातील शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या GRE आणि TOEFL परीक्षांची तयारी करत तिने 340 पैकी 310 गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. या गुणवत्तेच्या जोरावर तिची अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठात निवड झाली.

सन 2024 ते 2026 या कालावधीत तिने अमेरिकेत अत्यंत संघर्षमय परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले. अखेर 18 मे 2026 रोजी झालेल्या दीक्षांत समारंभात तिला “मास्टर्स इन मेकॅट्रॉनिक्स अँड रोबोटिक्स” ही पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली.

आपल्या यशाचे श्रेय आम्रपालीने आपल्या आई-वडिलांना, शिक्षकांना आणि कुटुंबीयांना दिले आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गडचिरोली जिल्ह्यासह विविध स्तरांतून तिचे अभिनंदन होत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरत आहे.

जिद्द, मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर गडचिरोलीच्या कन्येने अमेरिकेत यशाचा झेंडा रोवला असून तिच्या या यशाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 🎓🇮🇳🇺🇸💐

Ad 1
Tags: Satish Neware
Previous Post

कंदर येथे ५४ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न

Next Post

अखेर ठाण्यातून शिंदे गटाकडून रवींद्र फाटक; महायुतीचे विधान परिषदेसाठी जागावाटप जाहीर

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

अखेर ठाण्यातून शिंदे गटाकडून रवींद्र फाटक; महायुतीचे विधान परिषदेसाठी जागावाटप जाहीर

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In