• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कंदर येथे ५४ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in Blog
0
कंदर येथे ५४ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न
0
SHARES
44
VIEWS
Ad 1

करमाळा प्रतिनिधी

तालुक्यातील मौजे कंदर येथे सोलापूर जिल्हा परिषदेच्या भाजप गट नेत्या रश्मी बागल व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिग्विजय भैय्या बागल यांच्या निधीतून मंजूर करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी भाजप नेते दिग्विजय भैय्या बागल यांच्या हस्ते सुमारे ५४ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.

RelatedPosts

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

गावातील रस्ते, मूलभूत सुविधा तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित विविध कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला असून त्यामध्ये श्री दत्त वजन काटा ते जाधव वस्ती रस्ता (७ लाख रुपये), सावंत वस्ती ते पराडे वस्ती रस्ता (६ लाख रुपये), जिल्हा परिषद शाळा ते माने वस्ती रस्ता (७ लाख रुपये), श्री ज्योतिर्लिंग मंदिर येथे भूमिगत गटार बांधकाम (१४ लाख रुपये), सिमेंट काँक्रिट रस्ता (७ लाख रुपये), स्ट्रीट लाईट पोल शिफ्टिंग (१ लाख रुपये), विद्युतीकरण (६ लाख रुपये) तसेच श्रीराम मंदिर परिसरात सिमेंट काँक्रिटीकरण (३ लाख रुपये) या कामांचा समावेश आहे.

या विकासकामांमुळे गावातील वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना तसेच शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतूक, स्वच्छता व मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमात बोलताना दिग्विजय भैय्या बागल म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि पालकमंत्री Jaykumar Gore यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील लोकहिताची विकासकामे सातत्याने राबविण्यात येत आहेत. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच भविष्यातही विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, भाजपा अध्यक्ष सचिन पिसाळ, संचालक सतीश नीळ, कल्याण सरडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव बंडगर, संचालक कुलदीप पाटील, सरपंच मौला मुलाणी, पोलीस निरीक्षक भगत मॅडम, तंटामुक्त समिती अध्यक्ष नानासाहेब लोकरे, अरुण सरडे, मारुती यादव, महावीर तळेकर, रवी जाधव, गोरख जगदाळे, तानाजी देशमुख, दत्तात्रय सोनवणे, बाळासाहेब पराडे, सुभाष पवार, रावसाहेब जाधव, पंचायत समिती सदस्य नितीन तकीक, डॉ. विजय रोकडे, विष्णु माने, आबा लोकरे, राजकुमार सरडे, बाळासाहेब घाडगे, संतोष माने, धर्मराज लोकरे यांच्यासह गावातील व पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान दिग्विजय भैय्या बागल यांचा सत्कार सरपंच मौला मुलाणी व कार्यक्रमाचे संयोजक रंगनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन सागर शिंदे यांनी मानले.

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणाऱ्या या विकासकामांमुळे कंदर गावाच्या प्रगतीला नवी गती मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Previous Post

‘श्रीरामपूर मर्चंट असोसिएशन’च्या अध्यक्षपदी प्रवीण गुलाटी, सेक्रेटरीपदी योगेश ओझा

Next Post

गडचिरोलीच्या कन्येने अमेरिकेत रोवला यशाचा झेंडा

Related Posts

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन
Blog

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
16
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।
Blog

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026
30
Blog

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026
6
डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद
Blog

डॉ गोविंद नांदेडे यांच्या ३८ पदव्या, सात सुवर्णपदकांची विश्वविक्रमात नोंद

August 30, 2026
49
बोरिवली मध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न.
Blog

बोरिवली मध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त मुक्ती दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

August 30, 2026
51
Blog

श्रीराम लीला शैक्षणिक सोसायटी व्दारा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी रत्न पुरस्कार २०२६ करिता प्रस्ताव पाठवावे.

August 30, 2026
2
Next Post
गडचिरोलीच्या कन्येने अमेरिकेत रोवला यशाचा झेंडा

गडचिरोलीच्या कन्येने अमेरिकेत रोवला यशाचा झेंडा

ताज्या बातम्या

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In