• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अवैध दारुविक्रेत्यांवर जिल्हा पोलिसांची “वॉशआऊट” मोहीम : गुन्ह्यांत रुपये ०१ कोटी ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
अवैध दारुविक्रेत्यांवर जिल्हा पोलिसांची “वॉशआऊट” मोहीम : गुन्ह्यांत रुपये ०१ कोटी ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
14
VIEWS
Ad 1
Ad 1
  • अवैध दारुविक्रेत्यांवर जिल्हा पोलिसांची “वॉशआऊट” मोहीम : गुन्ह्यांत रुपये ०१ कोटी ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त*.
    प्रतिनिधी वर्धा…
    जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि निर्मितीच्या साखळीवर पूर्णपणे आळा घालण्यासाठी वर्धा पोलीस दलाने काल दि. ३०/०५/२०२६ ते ३१/०५/२०२६ रोजी दरम्यान अत्यंत नियोजनबद्ध ‘वॉशआऊट” मोहीम यशस्वीरित्या राबविली. या धडक कारवाईत जिल्ह्यामध्ये ४५ अवैद्य देशी/विदेशी दारू विक्रीचे गुन्हे तसेच १४४ गावठी दारू विक्रीचे असे एकूण १७२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे ०१ कोटी ५४ लाख रुपयांचा दारूसाठा आणि संबंधित मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला आहे.

श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन या ‘सर्जिकल स्ट्राईक’ची योजना आखली. जिल्ह्यातील अवैध दारूविक्रेते मोठ्या प्रमाणावर दारू गाळून ती मोठ्या प्रमाणात तयार करून त्याचा साठा साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर मागील पाच ते सहा दिवसांपासून अवैध दारूभट्ट्यांच्या ठिकाणी, विशेषतः शहरालगतचा परिसर तसेच गावाबाहेर, जंगल शिवारात आणि जाण्या-येण्यास अडचणीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून गोपनीय पाळत ठेवण्यात आली. त्याच प्रमाणे बाहेरील जिल्ह्यातून चोरट्या मार्गाने विक्रीस येणारी देशी विदेशी दारू विक्री करणारे आणि ती विकण्याच्या ठिकाणावर पाळत ठेवण्यात आली.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलिस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यांतील ४ उपविभागीय पोलीस अधिकारी, १९ ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखेचे असे एकूण ३९ अधिकारी व २५८ पोलीस अंमलदार यांना वॉशआऊट मोहीममध्ये सहभागी करुन घेण्यात आले.

दि. ३०/०५/२०२६ च्या सकाळी ०६,०० वाजल्यापासून या सर्व गावठी दारूभट्टीची ठिकाणे आणि देशी विदेशी दारूची विक्री करण्याच्या ठिकाणावर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत एकूण १९५ आंरोपींवर १७२ गुन्हे दाखल करण्यात आले.

भविष्यातील कठोर कारवाईचे संकेत

या अचानक केलेल्या ‘वॉशआऊट “मोहिमेमुळे अवैध दारू तयार करणारे, पुरवठादार आणि विक्रेते यांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, “वर्धा जिल्ह्यात अवैध दारूचे कोणतेही प्रकार चालणार नाहीत. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि दारू विक्रेत्यांकडून कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून अशा प्रकारची अचानक कारवाई (वॉशआऊट मोहीम) करण्यात आली आहे.”

(विनोद चौधरी) पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा

Ad 1
Tags: Shankar Panbude
Previous Post

विकासाच्या नावाखाली यशवंत चौकाचा रखडलेला विकास; नागरिकांमध्ये संताप

Next Post

हिंगणघाट पोलिसांची ‘वॉश आउट’ मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई; १ लाख ९० हजारांच्या

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
13
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
हिंगणघाट पोलिसांची ‘वॉश आउट’ मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई; १ लाख ९० हजारांच्या

हिंगणघाट पोलिसांची 'वॉश आउट' मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई; १ लाख ९० हजारांच्या

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In