• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एससी प्रवर्गाचे उपवर्गीकरण करून लोकसंख्येनुसार आरक्षण द्या; लहुजी शक्ती सेनेचे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
एससी प्रवर्गाचे उपवर्गीकरण करून लोकसंख्येनुसार आरक्षण द्या; लहुजी शक्ती सेनेचे निवेदन
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

माहूर | प्रतिनिधी

अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातील विविध जातींना आरक्षणाचा समन्यायी लाभ मिळावा यासाठी एससी प्रवर्गाचे उपवर्गीकरण करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची टक्केवारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी लहुजी शक्ती सेना (मातंग समाज) माहूर तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

यासंदर्भातील निवेदन तहसीलदार माहूर यांच्या मार्फत सदस्य सचिव तथा महासंचालक, Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute (BARTI) तसेच सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे पाठविण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर राज्यात अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये ५९ पेक्षा अधिक पोटजातींचा समावेश असून आरक्षणाचा मोठा लाभ काही मोजक्या जातींपुरता मर्यादित राहिल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक अति-मागास आणि दुर्लक्षित जाती विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिल्या आहेत.

उपवर्गीकरणाची मागणी

लहुजी शक्ती सेनेने एससी प्रवर्गाचे ए, बी, सी, डी अशा गटांमध्ये वर्गीकरण करून संबंधित जातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. यामुळे आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत पोहोचेल आणि सामाजिक न्यायाची संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविता येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अति-मागास घटकांना न्याय मिळावा

सरकारी नोकऱ्या, उच्च शिक्षण आणि विविध शासकीय योजनांमध्ये अति-मागास व अल्पप्रतिनिधित्व असलेल्या जातींना योग्य संधी मिळण्यासाठी उपवर्गीकरण आवश्यक असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. शासनाने गठित केलेल्या समितीने या मागणीचा गांभीर्याने विचार करून एससी उपवर्गीकरणाच्या बाजूने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

या निवेदनावर लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष देवानंद भांडवले यांच्यासह शिवाजी जोगदंडे, अतुल खानजोडे, मिलिंद चांदणे, दत्ता आठवले, आतिश काळे, सतीश उमाप, शेकन्ना गुंडावार, गणपत मस्के तसेच अनेक समाजबांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सामाजिक न्याय आणि आरक्षणातील समतोल प्रतिनिधित्व या मुद्द्यांवर ही मागणी महत्त्वाची मानली जात असून, शासनाची भूमिका काय राहते याकडे समाजबांधवांचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Previous Post

श्रीक्षेत्र माहूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

Next Post

सातारा-देवळाई परिसर पाण्यासाठी वंचित; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

सातारा-देवळाई परिसर पाण्यासाठी वंचित; नागरिकांमध्ये तीव्र संताप

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In