• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देवरी ते अमेरिका; डॉ. संतोष राऊत यांची उत्तुंग भरारी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in ताज्या घडामोडी
0
देवरी ते अमेरिका; डॉ. संतोष राऊत यांची उत्तुंग भरारी
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

देवरी | प्रतिनिधी

गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील रहिवासी तथा जिल्हा परिषद हायस्कूल, देवरीचे माजी विद्यार्थी डॉ. संतोष ईश्वरदास राऊत यांना अमेरिकेतील जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाने प्रतिष्ठित पदवी प्रदान करून सन्मानित केले आहे. दि. २८ मे २०२६ रोजी हार्वर्ड विद्यापीठात आयोजित भव्य दीक्षांत समारंभात त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली.

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

अमेरिकेतील बोस्टन येथे स्थित हार्वर्ड विद्यापीठ हे जागतिक स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित आणि उच्च दर्जाचे विद्यापीठ मानले जाते. डॉ. राऊत यांनी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) “बौद्ध तत्त्वज्ञान” या विषयात पीएच.डी. संपादन केली आहे. त्यानंतर ते हैदराबाद येथील इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी (EFLU) मध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाच विद्यापीठाची परवानगी घेऊन त्यांनी मागील तीन वर्षांपासून हार्वर्ड विद्यापीठात “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची व्यक्ती आणि समाज परिवर्तनाची दृष्टी तसेच बौद्ध तत्त्वज्ञान” या विषयावर संशोधन केले. त्यांच्या या संशोधन कार्याच्या आधारे त्यांना “मास्टर इन थिऑलॉजिकल स्टडीज” ही पदवी प्रदान करण्यात आली.

विशेष म्हणजे, या विषयावर आधारित त्यांनी तयार केलेला स्वतंत्र अभ्यासक्रम हार्वर्ड विद्यापीठाने मान्य केला असून मागील तीन वर्षांपासून तेथील विद्यार्थ्यांना त्यांनी हा विषय अध्यापन केला आहे. त्यांच्या अभ्यासक्रमाला आणि व्याख्यानांना विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांकडूनही मोठी दाद मिळाली. या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि बौद्ध धम्माची सखोल ओळख आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली.

सन २०२५ आणि २०२६ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने आयोजित “डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती” आणि “बुद्ध जयंती” कार्यक्रमांमध्येही त्यांना विशेष निमंत्रित म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये त्यांनी दिलेल्या प्रभावी व्याख्यानांचे सर्वत्र कौतुक झाले.

डॉ. संतोष राऊत हे त्रिरत्न बौद्ध महासंघ या जागतिक संघटनेचे सदस्य असून तेथे ते “धम्मचारी मैत्रिवीर नागार्जुन” या नावाने परिचित आहेत. नागपूर येथील त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या नागलोक केंद्राचे सहसंचालक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

देवरीसारख्या दुर्गम भागातून प्राथमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी उच्च शिक्षणाच्या बळावर जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. बी. फार्म. शिक्षणासाठी अहमदनगरला गेलेल्या डॉ. राऊत यांचा शैक्षणिक प्रवास पुढे देश-विदेशात विस्तारत गेला आणि आज त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान प्राप्त केले आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून देवरीसह संपूर्ण गोंदिया जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.

आपल्या यशाचे श्रेय डॉ. राऊत यांनी आपल्या स्वर्गीय आई कातांबाई राऊत, वडील आय. जे. राऊत, कुटुंबीय, शिक्षक आणि मित्रपरिवार यांना दिले आहे.

Previous Post

राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी; सर्व समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

Next Post

खर्डी ग्रामपंचायतीला युवा संकल्प सेनेचे जाहीर प्रश्न; मूलभूत सुविधांबाबत नाराजी

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
13
Next Post

खर्डी ग्रामपंचायतीला युवा संकल्प सेनेचे जाहीर प्रश्न; मूलभूत सुविधांबाबत नाराजी

ताज्या बातम्या

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 31, 2026
ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

August 31, 2026
असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

August 31, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In