• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला अंबाजोगाईसह राज्यभरातून पाठिंबा; पत्रकार परमेश्वर गित्ते यांचे एकदिवसीय उपोषण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | अंबाजोगाई | प्रतिनिधी

गांधीवादी विचारवंत, संशोधक आणि रमण मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाचा १९ वा दिवस उलटल्यानंतरही केंद्र सरकारकडून कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप करत अंबाजोगाई येथे पत्रकार परमेश्वर गित्ते यांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून आंदोलनाला पाठिंबा दिला.

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

यावेळी बोलताना परमेश्वर गित्ते यांनी, “आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित संशोधकाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष होणे दुर्दैवी असून, लोकशाहीत आंदोलनकर्त्यांच्या भावना आणि त्यांच्या जीविताची दखल घेणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले.

या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे तसेच ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. असीम सरोदे यांनी दूरध्वनीद्वारे पाठिंबा दर्शविला. “आम्ही माणूस म्हणून तुमच्या सोबत आहोत,” अशी भूमिका त्यांनी व्यक्त करत आंदोलन अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले.

अंबाजोगाई येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत झालेल्या या लाक्षणिक उपोषणाला वंचित बहुजन आघाडी, मराठा सेवा संघ, लोक जनशक्ती पार्टी, समाजवादी पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) तसेच विविध सामाजिक संघटना व संस्थांनी पाठिंबा दिला.

या प्रसंगी माजी आमदार पृथ्वीराज साठे, राज्य दंत परिषदेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, ॲड. असीम सरोदे, अनिकेत लोहिया, प्रा. कल्पना पाटील, ॲड. आनंतराव जगतकर, दिलीपदादा सांगळे, ॲड. माणिकराव बावणे, शिवाजी दादा कुलकर्णी, अशोक हेडे, ॲड. इस्माईल गवळी, राजेश वाहुळे, डॉ. राजेश इंगोले, डॉ. नागेश जोंधळे, मेजर अजिमोद्दीन इनामदार, ज्येष्ठ साहित्यिक दत्ता वालेकर, सेवानिवृत्त न्यायाधीश ॲड. बाबुराव तिडके, नगरसेवक अकबर पठाण, सुनील जगताप, कालिदास आपेट यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची केंद्र सरकारने तातडीने दखल घ्यावी, तसेच सोनम वांगचुक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली.

अंबाजोगाईत मानवता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी व्यक्त करण्यात आलेल्या या पाठिंब्याची राज्यभर चर्चा होत असून, “माणूस जगला पाहिजे” या भूमिकेतून हे आंदोलन करण्यात आल्याचे पत्रकार परमेश्वर गित्ते यांनी सांगितले.

Previous Post

एसबीआय शाखेतील गैरवर्तन प्रकरणाला नवे वळण; पत्रकार अहमद अन्सारी 10 ऑगस्टपासून तिसऱ्यांदा आमरण उपोषणावर

Next Post

नीट (NEET) परीक्षेत ऐतिहासिक यश; खडकीच्या श्रावणी कुदळेने देशपातळीवर मानाचा ठसा उमटवला

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
17
Next Post

नीट (NEET) परीक्षेत ऐतिहासिक यश; खडकीच्या श्रावणी कुदळेने देशपातळीवर मानाचा ठसा उमटवला

ताज्या बातम्या

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In