• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षपदी माधुरी सावगावे; पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 19, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
148
VIEWS
Ad 1
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी

लायन्स इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाड (प्रांत 3234-D1, रिजन-4, झोन-1) चा 42 वा पदग्रहण समारंभ शनिवारी (18 जुलै) लायन्स आय हॉस्पिटल, गणंजय नगर, कुरुंदवाड येथे उत्साहात पार पडला. यावेळी ला. सौ. माधुरी सावगावे यांची अध्यक्षपदी, ला. सौ. शैलजा आलासे यांची सचिवपदी, तर ला. सौ. रुपाली व्होरा यांची खजिनदारपदी निवड जाहीर करण्यात आली.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

कार्यक्रमाची सुरुवात मावळत्या अध्यक्षा ला. सौ. अर्चना सुतार यांच्या हस्ते घंटानादाने झाली. त्यानंतर ला. आसावरी जमदग्नी यांनी ध्वजवंदन केले. प्रमुख पाहुण्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच नव्या पदाधिकाऱ्यांना पदभार व पिन प्रदान करण्यात आल्या.

या सोहळ्यास ला. अशोक मेहता (PMJF), माजी प्रांतपाल व मल्टिपल जी.ई.टी., तसेच ला. इंजि. सुनील सुतार (PMJF), माजी प्रांतपाल व माजी मल्टिपल सेक्रेटरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांचा परिचय व स्वागत ला. प्रा. सुनील चव्हाण यांनी केले.

यावेळी ला. सौ. आसावरी जमदग्नी यांनी वर्ष 2025-26 चा कार्यअहवाल सादर केला. मावळत्या अध्यक्षा ला. सौ. अर्चना सुतार यांनी सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल आभार मानून नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा संदेश देत झाडांना पाणी घालण्यात आले. त्यानंतर नव्या कार्यकारिणीचा अधिकृत पदग्रहण सोहळा पार पडला.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

  • अध्यक्ष – ला. सौ. माधुरी सावगावे
  • सचिव – ला. सौ. शैलजा आलासे
  • खजिनदार – ला. सौ. रुपाली व्होरा
  • प्रथम उपाध्यक्ष – ला. सौ. रुपाली चव्हाण
  • द्वितीय उपाध्यक्ष – ला. सौ. वर्षा घोरपडे
  • तृतीय उपाध्यक्ष – ला. ॲड. देवराज मगदूम
  • संयुक्त सचिव – ला. सौ. आरती दानोळे
  • संयुक्त खजिनदार – ला. सौ. अपर्णा बिडकर

याशिवाय विविध समित्यांवर आणि जबाबदाऱ्यांवर इतर पदाधिकाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली.

या प्रसंगी ला. इंजि. सुनील सुतार यांनी मार्गदर्शन करत लायन्स क्लबच्या समाजसेवेच्या परंपरेचा गौरव केला. ला. अशोक मेहता यांनी सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ देत आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी मावळत्या पदाधिकाऱ्यांचा तसेच एस. के. पाटील महाविद्यालय, कुरुंदवाड येथे प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल ला. प्रा. सुनील चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कार्याबद्दल काही सदस्यांचा गौरवही करण्यात आला.

नूतन अध्यक्षा ला. सौ. माधुरी सावगावे यांनी आगामी वर्षात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमास कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर परिसरातील लायन्स सदस्य, मान्यवर, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन ला. ॲड. विजय जमदग्नी यांनी केले, तर आभार प्रदर्शन ला. सौ. शैलजा आलासे यांनी मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Ad 1
Tags: Darikant Kolekar
Previous Post

कुरुंदवाड नगरपरिषदेत अजितदादा पवार यांचे तेलचित्र लावून जयंती साजरी करण्याची मागणी

Next Post

टाकळीत ओढ्यात मोठ्या प्रमाणावर दूध फेकल्याने खळबळ; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा धसका?

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
15
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
32
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post

टाकळीत ओढ्यात मोठ्या प्रमाणावर दूध फेकल्याने खळबळ; अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईचा धसका?

ताज्या बातम्या

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

October 18, 2026
माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 18, 2026

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In