• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेची भक्तिमय दिंडी; पावसाच्या सरींमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
51
VIEWS
Ad 1

इंदापूर | प्रतिनिधी

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सपकळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पावसाच्या सरींमध्येही विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात संपूर्ण गावातून दिंडी काढत भक्तीमय वातावरण निर्माण केले.

RelatedPosts

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

दिंडीत विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई, विठ्ठल-रुक्मिणी, वासुदेव आदींची आकर्षक वेशभूषा साकारली होती. त्यांच्या देखण्या सादरीकरणामुळे संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले. दिंडीदरम्यान घोड्यांच्या उपस्थितीत पारंपरिक गोल रिंगणाचेही आयोजन करण्यात आले, ज्याने उपस्थित ग्रामस्थ आणि पालकांची मने जिंकली.

दिंडी गावातून मार्गक्रमण करत असताना विविध ठिकाणी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे उत्साहाने स्वागत केले. विद्यार्थ्यांना पोहे, चहा, नाश्ता, फळे आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहकार्यामुळे दिंडी सोहळ्याला अधिक रंगत आली.

या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक महादेव वसंतराव घोळवे, शिक्षिका शैलजा दिनकर गुंड, नीता भुजबळ, सुदर्शन भुजबळ आणि रेखा वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले. शिक्षकांच्या नियोजनामुळे आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

या दिंडीत विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संत परंपरेचा वारसा, संस्कार आणि भक्तीभाव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.

Tags: Shatrughan Ghadge
Previous Post

लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची जयंती उत्साहात साजरी

Next Post

कापूस सघन लागवड तंत्रज्ञान महत्त्वाचे; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Related Posts

ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
132
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

September 10, 2026
6
Next Post

कापूस सघन लागवड तंत्रज्ञान महत्त्वाचे; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

ताज्या बातम्या

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In