• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कापूस सघन लागवड तंत्रज्ञान महत्त्वाचे; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

पाथरी | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे रेणाखळी येथे दि. २० जुलै रोजी आत्मा (ATMA) अंतर्गत शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कापूस पिकातील सघन लागवड तंत्रज्ञान, दादा लाड लागवड पद्धत आणि गळफांदी काढण्याचे महत्त्व याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

RelatedPosts

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

हा कार्यक्रम प्रकल्प संचालक (आत्मा) दौलत चव्हाण, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) अभिषेक घोडके आणि तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

यावेळी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विशाल दलाल यांनी सघन लागवड व दादा लाड तंत्रज्ञानाची माहिती देत कापूस पिकातील गळफांदी काढण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले.

सहाय्यक कृषी अधिकारी सुखदेव गिरी यांनी सांगितले की, कापूस पिकात योग्य लागवड पद्धती आणि पीक व्यवस्थापनाचा अवलंब केल्यास अधिक उत्पादनासह दर्जेदार कापूस मिळू शकतो. कपाशीमध्ये गळफांदी आणि फळफांदी असे दोन प्रकारचे फांद्यांचे स्वरूप असते. गळफांदी तुलनेने अनुत्पादक तर फळफांदी उत्पादनक्षम असते.

त्यांनी सांगितले की, दादा लाड तंत्रज्ञानानुसार लागवडीनंतर ४० ते ४५ दिवसांनी गळफांदी काढली जाते, तर ६० ते ७० दिवसांनी किंवा झाडाची उंची सुमारे साडेतीन फूट झाल्यावर शेंडा खुडला जातो. त्यामुळे झाडातील अन्नद्रव्यांचा पुरवठा फळफांद्यांकडे अधिक प्रमाणात होऊन बोंडांची वाढ चांगली होते. परिणामी उत्पादनात वाढ होते तसेच बोंडसड, कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन कापसाची गुणवत्ता सुधारते.

तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे यांनी शेतकऱ्यांना सघन लागवड आणि दादा लाड तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करत कापूस उत्पादनात वाढ करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तालुका उपतंत्रज्ञान व्यवस्थापक रमेश सिरस यांनी मानले. या शेतीशाळेला परिसरातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

Tags: Ahamad Ansari
Previous Post

सपकळवाडी जिल्हा परिषद शाळेची भक्तिमय दिंडी; पावसाच्या सरींमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Next Post

तुरा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

Related Posts

ताज्या घडामोडी

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026
114
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना उबाठाच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

म्हसळा पोलीस ठाण्याची इमारत भव्य व्हावी; मात्र नागरिकांना येथे येण्याची वेळ कमी यावी

September 10, 2026
3
ताज्या घडामोडी

गणरायाच्या आगमनाची लगबग; चामोर्शीत गणेशमूर्तींना अंतिम रूप

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड

September 10, 2026
2
ताज्या घडामोडी

सप्तश्रृंगीगड–नांदुरी मार्ग १७ दिवस वाहतुकीसाठी बंद

September 10, 2026
6
Next Post

तुरा येथे स्व. अजितदादा पवार यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

ताज्या बातम्या

बालविवाह प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांची कारवाई; २६ वर्षीय नवरदेवाला अटक

September 10, 2026

सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व राष्ट्रीय ऐक्याचा केंद्रबिंदू

September 10, 2026

धन्याचा बैलपोळा; शेतकऱ्याच्या सख्याची बदलत्या काळातील कहाणी

September 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In