• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुरंदर तालुक्यात २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्राला दुष्काळाचा फटका

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

४० हजारांहून अधिक शेतकरी बाधित; ३४ कोटी ८५ लाख रुपयांहून अधिक मदतीची अपेक्षा, चारा पिकांचे क्षेत्र वाढविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

पुरंदर / प्रतिनिधी :

RelatedPosts

महिलांच्या इच्छाशक्तीला कुटुंबाची साथ हवी – डॉ. ममता शिवतारे

सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने नेत्र व दंत तपासणी शिबिर

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘स्वराज्य’ आक्रमक; दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा

यंदाच्या खरीप हंगामात पुरंदर तालुक्यातील २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्राला दुष्काळाचा फटका बसला असून, हजारो शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून ३४ कोटी ८५ लाख ५०० रुपयांच्या मदतीची अपेक्षा असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी श्रीधर चव्हाण यांनी दिली.

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार महसूल विभाग, पंचायत समिती आणि कृषी विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. खरीप हंगामात तालुक्यात ३३ हजार २११ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यापैकी २३ हजार ६८४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना दुष्काळाचा फटका बसल्याचे पंचनाम्यांतून समोर आले आहे.

जिरायती, बागायती आणि फळपिकांचे नुकसान

तालुक्यातील जिरायती क्षेत्रातील भात, बाजरी, सोयाबीन, भुईमूग आणि वाटाणा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एकूण १४ हजार १८६ शेतकऱ्यांच्या ८ हजार १२६ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती पिके बाधित झाली आहेत.

तसेच २३ हजार ३५६ शेतकऱ्यांच्या १२ हजार ८४१ हेक्टर बागायती क्षेत्रातील ऊस आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. सीताफळ, डाळिंब, आंबा, पेरू आणि अंजीर यांसारख्या फळपिकांनाही दुष्काळाचा फटका बसला आहे. या फळपिकांचे ५ हजार ५४७ शेतकऱ्यांच्या २ हजार ७१७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली.

राज्य शासनाच्या २०२३ मधील आदेशानुसार नुकसानभरपाईसाठी निधी अपेक्षित असून, पात्र शेतकऱ्यांना मदत मिळण्याबाबत शासनाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

चारा पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न

दुष्काळसदृश परिस्थितीत आगामी रब्बी हंगामातील मका आणि चारा पिकांच्या व्यवस्थापनासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ऑनलाइन वेबिनारच्या माध्यमातून पीक व्यवस्थापन, चारा पिकांचे क्षेत्र वाढविणे आणि उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली जात आहे.

कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून चारा पिकांच्या लागवडीसाठी मार्गदर्शन करणार आहेत. दुष्काळाच्या परिस्थितीत जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राहावी, यासाठी चारा पिकांचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

१५ हजार ८६० शेतकऱ्यांना ज्वारी बियाण्यांचे मिनी किट

कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण उपअभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य (रब्बी ज्वारी) २०२६-२७ या उपक्रमातून पुणे जिल्ह्यातील १५ हजार ८६० शेतकऱ्यांना ज्वारी बियाण्यांचे मिनी किट देण्यात येणार आहेत. ऑनलाइन अर्जांनुसार निवड झालेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी चार किलो ज्वारी बियाणे देण्याचे नियोजन असून, त्यासाठी एकूण ६३४.४० क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

दरम्यान, पुरंदर तालुक्यातील धरणांमधील पाणीसाठा सध्या सरासरी ७० ते ८० टक्क्यांपर्यंत असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानभरपाई, चारा पिकांचे नियोजन आणि बियाणे योजनांची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे.

Ad 1
Tags: Suresh Kamthe
Previous Post

महिलांच्या इच्छाशक्तीला कुटुंबाची साथ हवी – डॉ. ममता शिवतारे

Next Post

शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

Related Posts

महिलांच्या इच्छाशक्तीला कुटुंबाची साथ हवी – डॉ. ममता शिवतारे
ताज्या घडामोडी

महिलांच्या इच्छाशक्तीला कुटुंबाची साथ हवी – डॉ. ममता शिवतारे

October 27, 2026
6
सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने नेत्र व दंत तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने नेत्र व दंत तपासणी शिबिर

October 27, 2026
9
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘स्वराज्य’ आक्रमक; दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा
ताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ‘स्वराज्य’ आक्रमक; दिवाळीत तीव्र आंदोलनाचा इशारा

October 27, 2026
5
चिंचणी-वांगी पोलिसांची कारवाई; फसवणुकीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात
ताज्या घडामोडी

चिंचणी-वांगी पोलिसांची कारवाई; फसवणुकीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात

October 27, 2026
63
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात ‘मिशन खाकी’ उपक्रम उत्साहात
ताज्या घडामोडी

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात ‘मिशन खाकी’ उपक्रम उत्साहात

October 27, 2026
6
धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी
ताज्या घडामोडी

धर्माबाद तालुक्यात आरोग्य सेविका मुख्यालयी राहत नसल्याची तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

October 26, 2026
4
Next Post
शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? प्रकाश आंबेडकरांचा सरकारला सवाल

ताज्या बातम्या

हनुमंत महाराज निकम यांना ‘संत पाईक गौरव पुरस्कार’ प्रदान

हनुमंत महाराज निकम यांना ‘संत पाईक गौरव पुरस्कार’ प्रदान

October 27, 2026
कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी निर्माण करा! – आमदार शेखर निकम

कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी निर्माण करा! – आमदार शेखर निकम

October 27, 2026
मारेगावच्या धम्मराजिका बुद्ध विहारात वर्षावास समापन सोहळा उत्साहात

मारेगावच्या धम्मराजिका बुद्ध विहारात वर्षावास समापन सोहळा उत्साहात

October 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In