• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिवा सताणे यांचे निधन

Pratik Tidke by Pratik Tidke
September 1, 2026
in Blog
0
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिवा सताणे यांचे निधन
0
SHARES
16
VIEWS
Ad 1
Ad 1

पेण : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील बुलंद आवाज आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय गोविंद शिवा सताणे यांचे मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने गागोदे खुर्द गावातील एक कणखर नेतृत्व, दानशूर व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक कार्यासाठी सदैव तत्पर असलेला कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

RelatedPosts

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोविंद शिवा सताणे हे गागोदे खुर्द येथील आदर्श ज्येष्ठ नागरिक तसेच पेण तालुक्याची शान म्हणून परिचित होते. सामाजिक कार्यात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क होता. प्रत्येकाच्या मदतीला तत्परतेने धावून जाणारे आणि समाजाच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पेण तालुक्यातील विविध गावांमध्ये दुःखाची लाट पसरली. सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच गागोदे खुर्द येथील ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. सिद्धार्थ मित्र मंडळ, तरुण मित्र मंडळ आणि रमाई महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.

६ सप्टेंबर रोजी पुण्यानुमोदन व श्रद्धांजली सभा

गोविंद शिवा सताणे यांच्या पुण्यानुमोदन, शोकसभा व श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरी, मु. गागोदे खुर्द, पोस्ट वरसई, ता. पेण, जि. रायगड येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास बौद्धाचार्य, नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयु. शिवाजी गोविंद सताणे, दिगंबर गोविंद सताणे, अरुण गोविंद सताणे, सिद्धार्थ मित्र मंडळ/तरुण मित्र मंडळ गागोदे खुर्द, रमाई महिला मंडळ गागोदे खुर्द आणि गागोदे खुर्द ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आंबेडकरी चळवळीतील समर्पित सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिवा सताणे यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली व विनम्र अभिवादन.

जय भीम! नमो बुद्धाय!

Ad 1
Previous Post

🌿 गावागावातील माणुसकीचा आधार… समाजसेवेचा खरा आरोग्यदूत! 🌿

Next Post

मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनचे सहावे (६वे) महाआरोग्य शिबिर उत्साहात; ७९० रुग्णांची तपासणी; ३५० गरजूंना चष्मेवाटप, ६० जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड; ५५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य…

Related Posts

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.
Blog

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

October 18, 2026
0
माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 18, 2026
5
Blog

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 18, 2026
4

October 16, 2026
55
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
35
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
84
Next Post
मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनचे सहावे (६वे) महाआरोग्य शिबिर उत्साहात; ७९० रुग्णांची तपासणी; ३५० गरजूंना चष्मेवाटप, ६० जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड; ५५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य…

मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनचे सहावे (६वे) महाआरोग्य शिबिर उत्साहात; ७९० रुग्णांची तपासणी; ३५० गरजूंना चष्मेवाटप, ६० जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड; ५५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य…

ताज्या बातम्या

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

न्यू हायस्कूल उळूप तालुका भूम येथे कायदेविषयक शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

October 18, 2026
माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 18, 2026

कानळदा-जळगाव रस्त्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक पकडली; डंपरसह ५.४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In