• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनचे सहावे (६वे) महाआरोग्य शिबिर उत्साहात; ७९० रुग्णांची तपासणी; ३५० गरजूंना चष्मेवाटप, ६० जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड; ५५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य…

Pratik Tidke by Pratik Tidke
September 1, 2026
in Blog
0
मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशनचे सहावे (६वे) महाआरोग्य शिबिर उत्साहात; ७९० रुग्णांची तपासणी; ३५० गरजूंना चष्मेवाटप, ६० जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड; ५५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य…
0
SHARES
37
VIEWS
Ad 1

पुणे जिल्हा प्रतिनिधी : अविनाश घोगरे

RelatedPosts

सिल्लोडला नवे तहसीलदार; सागर वाघमारे घेणार पदभार

स्मार्ट चष्म्यातून परीक्षा गैरप्रकाराचा संशय; पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

सोनिमोहा येथे प्रहार संघटनेची शाखा स्थापन; शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती

शिरूर : मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशन, शिरूर यांच्या वतीने शनिवारी (दि. २९ ऑगस्ट) शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालयात सहावे (६वे) मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन दानशूर उद्योगपती प्रकाशशेठ धारिवाल, नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे, उपनगराध्यक्ष मितेशभैय्या गादिया, गटनेते तथा नगरसेवक नितीनदादा पाचर्णे आणि माजी उपनगराध्यक्ष जाकिरभाई पठाण यांच्या हस्ते करण्यात आले.


खिदमत फाउंडेशनच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून सामाजिक बांधिलकीतून मोफत आरोग्यसेवेचा उपक्रम राबविला जात आहे. यंदाच्या शिबिरालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध आजारांबाबत आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. एकूण ७९० रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच ३५० गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, तर ६० रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. आरोग्यसेवेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत ५५० शालेय विद्यार्थ्यांना वही, पेन व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शिबिरासाठी आलेले रुग्ण, नागरिक व उपस्थित मान्यवरांसाठी फाउंडेशनच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
विविध वैद्यकीय संस्थांचे सहकार्य महाआरोग्य शिबिरासाठी मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटल, सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी, शिरूर, श्री गणेशा हॉस्पिटल, शिरूर, वेदांता क्रिटिकेअर हॉस्पिटल, शिरूर, मीरा नर्सिंग होम, शिरूर, सुखायु हॉस्पिटल, शिरूर तसेच रुबी हॉल क्लिनिक, शिरूर यांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा व सहकार्य उपलब्ध झाले.


तसेच डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. दर्शा फ्रीडम फाउंडेशन, राजगुरुनगर यांच्या सौजन्याने  गरजू नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. शिबिरात डॉ. नीरज शहा, डॉ. विजय दरडा (LCEH, मुंबई), डॉ. परवेज बागवान (M.D. Ayu., Ph.D. Scholar), डॉ. महेक शकिल शेख (B.H.M.S.) तसेच दंतरोगतज्ज्ञ डॉ. अनिकेत चोपडा यांनी रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन केले. स्त्रीरोगतज्ज्ञांच्या माध्यमातून महिलांसाठीही आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या वैद्यकीय संस्था, डॉक्टर आणि आरोग्यसेवेत योगदान देणाऱ्या सर्व वैद्यकीय पथकाचे खिदमत फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. सहा वर्षांच्या सेवेतून निर्माण झाला विश्वास गेल्या सहा वर्षांपासून खिदमत फाउंडेशनकडून शिरूर परिसरातील गरजू नागरिकांसाठी विविध आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत.

आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेणे कठीण असलेल्या नागरिकांना आरोग्य तपासणी, वैद्यकीय मार्गदर्शन, चष्मे तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न फाउंडेशनकडून केला जात आहे. उद्घाटनप्रसंगी दानशूर उद्योगपती प्रकाशशेठ धारिवाल यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “या महाआरोग्य शिबिराचे हे सहावे वर्ष आहे. गेल्या सहा वर्षांपासून खिदमत फाउंडेशन निःशुल्क आरोग्यसेवेचे काम सातत्याने करत आहे. गरजू रुग्णांपर्यंत विविध आरोग्य सुविधा पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. सातत्याने समाजाची सेवा करणाऱ्या या उपक्रमाचे निश्चितच कौतुक झाले पाहिजे.” नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांनीही फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “गेल्या सहा वर्षांपासून खिदमत फाउंडेशनच्या माध्यमातून हा समाजोपयोगी उपक्रम राबविला जात आहे. गरजू नागरिकांना मोफत आरोग्यसेवा मिळणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. फाउंडेशनच्या या उपक्रमाला शुभेच्छा असून, भविष्यात शिरूर नगरपरिषदेच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल.”

मान्यवरांची पस्थिती यावेळी नगरसेवक तथा बांधकाम सार्वजनिक समितीचे सभापती सुनील जाधव, नगरसेवक तथा स्वच्छता समितीचे सभापती एजाज बागवान, नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती आयेशा सय्यद, नगरसेविका तथा उपसभापती स्वप्नाली जामदार, नगरसेविका तथा पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनिता पोटे, नगरसेवक अभिजीत पाचर्णे, निलेश गाडेकर, सागर नरवडे, निलेश पवार, अमोल चव्हाण, रवी ढोबळे, नगरसेविका संगिता मल्लाव, रिंकू जगताप, चारूशिला कोळपकर, माजी सरपंच वर्षा काळे, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, माजी नगराध्यक्ष नसीम खान, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष सुखमार बोरा, राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर शहराध्यक्ष शरद कालेवार, शिरूर विकास आघाडीचे अध्यक्ष अॅड. सुभाष पवार, माजी उपसरपंच संभाजी कर्डिले, भारतीय जनता पार्टीचे संपर्कप्रमुख बाबूकाका पाचंगे, ज्येष्ठ पत्रकार नितीन बारवकर, प्रशांत शिंदे, साबीर शेख, सतीश धुमाळ, संजय बारवकर, शकील मणियार, प्रवीण गायकवाड, माजी नगरसेवक विनोद भालेराव, प्रवीण दसगुडे, संजय देशमुख, संदीप गायकवाड, अशोक पवार यांच्यासह मुद्दु सौदागर, राहील शेख, हाफीज बागवान, अविनाश जाधव, अविनाश शिंदे, स्वप्निल रेड्डी, महेंद्र येवले, सोनू धहुलच्या अक्षयदादा भवर, अविनाश घोगरे, मयूर भोसले, बंटी जोगदंड, गौरव बाफना, अमृत बोथरा, राहुल बोथरा, हर्षद ओस्तवाल, रेश्मा शेख, सविता बोराडे, संतोष शितोळे, तुकाराम खोले, सुशांत कुटे, किरण बनकर, मयूर नाहार, सुनील बोरा, आशिष नाहार, रूपेश गंगावणे, निलेश जाधव, वसीम सय्यद, वसीम शहा, तुषार अडसूळ, वसीम शेख, सुदर्शनांनी दरेकर, अमोल शहा, राजूा लामखडे, अमोल लुनिया, उषा वाखरे, रितू जाधव, डॉ. वैशाली साखरे, डॉ. स्मिता कवाद, प्रीती बनसोडे, शितील शर्मा, डॉ. संतोष पोटे, नामदेव घावटे, राजू शेख, योगेश जामदार, संपत दसगुडे, किरण खेडकर, सागर भोर, मुकुंद मुसळे आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

पदाधिकारी व स्वयंसेवकांचा पुढाकार महाआरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ शेख, सचिव हाजी मुस्ताक शेख, उपाध्यक्ष हाजी फारूख बागवान, सदस्य हाजी मुन्ना शेख, हाजी फिरोज बागवान यांनी नियोजन केले. तसेच स्वयंसेवक आवेज शेख, मतिन शेख, साद बागवान, जैद शेख, मुनसूर खान आणि शोएब बागवान यांनी रुग्णांची नोंदणी, मार्गदर्शन, तपासणी व्यवस्था, चष्मेवाटप आणि शैक्षणिक साहित्य वाटपासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राऊसाहेब चक्रे यांनी केले. खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी आसिफ शेख यांनी प्रास्ताविकातून फाउंडेशनच्या सामाजिक व आरोग्यविषयक कार्याची माहिती दिली. खिदमत फाउंडेशनचे सचिव हाजी मुस्ताक शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले. मोहम्मद पैगंबर जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिरातून आरोग्यसेवेबरोबरच सामाजिक बांधिलकी, मानवता आणि सेवाभावाचा संदेश देण्यात आला. सलग सहा वर्षे निःशुल्क आरोग्यसेवेचा उपक्रम राबवत खिदमत फाउंडेशनने शिरूरच्या सामाजिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.

……………………………………

“सातत्यपूर्ण सेवेतूनच समाजाचा विश्वास संपादन होतो”
खिदमत फाउंडेशनने गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून आरोग्यसेवेची गरज असलेल्या नागरिकांपर्यंत मदत पोहोचविली आहे. केवळ शिबिर आयोजित करण्यापेक्षा गरजू रुग्णांना प्रत्यक्ष उपचाराची सुविधा मिळणे अधिक महत्त्वाचे आहे. या दृष्टीने फाउंडेशनचे कार्य उल्लेखनीय असून, सामाजिक संस्थांनी अशाचूऊ प्रकारे सातत्यपूर्ण आणि लोकाभिमुख काम करण्याची गरज आहे.
— प्रकाशशेठ धारिवाल, दानशूर उद्योगपती

………………………………………

“आरोग्यसेवेसोबत सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम”
शिरूर शहरातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध संस्था पुढाकार घेत आहेत, ंचे समाधानाची बाब आहे. खिदमत फाउंडेशनच्या महाआरोग्य शिबिरामध्ये रुग्णांची तपासणी, चष्मेवाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आरोग्यसेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या उपक्रमातून दिसून येतो.
— ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे, नगराध्यक्षा, शिरूर नगरपरिषद

………………………………………………..

मोलाचे सहकार्य
डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे १८, गरजू नागरिकांना मोफत चष्मे वाटप सौजन्य : दर्शा फ्रीडम फाउंडेशन, राजगुरुनगर

Previous Post

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद शिवा सताणे यांचे निधन

Next Post

“पिण्याच्या पाण्यासाठी जाहीर उपोषण

Related Posts

सिल्लोडला नवे तहसीलदार; सागर वाघमारे घेणार पदभार
Blog

सिल्लोडला नवे तहसीलदार; सागर वाघमारे घेणार पदभार

September 1, 2026
0
स्मार्ट चष्म्यातून परीक्षा गैरप्रकाराचा संशय; पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा
Blog

स्मार्ट चष्म्यातून परीक्षा गैरप्रकाराचा संशय; पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

September 1, 2026
1
सोनिमोहा येथे प्रहार संघटनेची शाखा स्थापन; शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती
Blog

सोनिमोहा येथे प्रहार संघटनेची शाखा स्थापन; शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती

September 1, 2026
0
कोदरी रोडवरील अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून केली सुरुवात..
Blog

कोदरी रोडवरील अतिक्रमण काढण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून केली सुरुवात..

September 1, 2026
7
शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.
Blog

शहादा-तळोदा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; तब्बल 53 हजार बोगस व मृत मतदारांची नावे वगळली.

September 1, 2026
5
शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.
Blog

शिक्षणातूनच आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट; चांदाळा आश्रमशाळेत मार्गदर्शन शिबिर संपन्न.

September 1, 2026
3
Next Post
“पिण्याच्या पाण्यासाठी जाहीर उपोषण

"पिण्याच्या पाण्यासाठी जाहीर उपोषण

ताज्या बातम्या

सिल्लोडला नवे तहसीलदार; सागर वाघमारे घेणार पदभार

सिल्लोडला नवे तहसीलदार; सागर वाघमारे घेणार पदभार

September 1, 2026
स्मार्ट चष्म्यातून परीक्षा गैरप्रकाराचा संशय; पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

स्मार्ट चष्म्यातून परीक्षा गैरप्रकाराचा संशय; पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

September 1, 2026
सोनिमोहा येथे प्रहार संघटनेची शाखा स्थापन; शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती

सोनिमोहा येथे प्रहार संघटनेची शाखा स्थापन; शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In