• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत अनियमिततेचा आरोप;गटनेते तथा आ.विजयभाऊ वडेट्टीवार यांना शेतकऱ्यांचे निवेदन

Pratik Tidke by Pratik Tidke
September 3, 2026
in Blog
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेत अनियमिततेचा आरोप;गटनेते तथा आ.विजयभाऊ वडेट्टीवार यांना शेतकऱ्यांचे निवेदन
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

मुलचेरा :
मुलचेरा, दि. २८ ऑगस्ट २०२६ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा मुलचेरा येथे कर्जमाफीच्या रकमेबाबत अनियमितता झाल्याचा आरोप करीत मुलचेरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत काही शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष कर्जखात्यातील थकीत मुद्दल व व्याजाच्या रकमेपेक्षा कर्जमाफीच्या यादीत कमी रक्कम दर्शविण्यात आली आहे. काही प्रकरणांमध्ये मुद्दल रकमेपेक्षा कमी रक्कम समाविष्ट करण्यात आल्याचा, तर काही शेतकऱ्यांच्या व्याजाची रक्कम कर्जमाफीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

या संदर्भात बँक अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, यादीतील चुका शासन स्तरावर झाल्याचे सांगण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच यादीमध्ये समाविष्ट असलेली उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी स्वतः भरावी लागेल, असे सांगण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे.
यामुळे पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफी योजनेचा अपेक्षित लाभ मिळण्याऐवजी अनावश्यक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांनी मा. विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्याकडे निवेदन सादर करून या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करावी, बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मुलचेरा येथील संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची तपासणी करावी, प्रत्यक्ष थकीत मुद्दल व व्याज आणि कर्जमाफी यादीतील रकमेची पडताळणी करावी तसेच पात्र शेतकऱ्यांना नियमानुसार संपूर्ण कर्जमाफीचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.
निवेदनासोबत मा.डॉ.अजय भाऊ कंकडालवार माजी जिल्हा अध्यक्ष तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी, कालिदास कुसनाके तालुका अध्यक्ष मुलचेरा आदिवासी काँग्रेस कमेटी संबंधित शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या असून, रामू सोमा तोरे (धन्नूर), सुधाकर गुड्डी सेंडामके (धन्नूर) तिरमा गुड्डी सेंडमाके,शालीक सेंडमाके सरपत नैताम, बिचेंगा सिडाम काकरगट्टा यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे.
“कर्जमाफी योजनेतील रकमेची तफावत तात्काळ दूर करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा,” अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Previous Post

आदिवासी वसतिगृहांमध्ये बाह्य संस्थांच्या हस्तक्षेपाला विरोध; MoU रद्द करण्याची मागणी

Next Post

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
46
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
50
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
31
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
75
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
14
Next Post

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In