• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यास जीवे मारण्याची धमकी! गुन्हा दाखल न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा

Pratik Tidke by Pratik Tidke
September 3, 2026
in Blog
0
श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यास जीवे मारण्याची धमकी! गुन्हा दाखल न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा
0
SHARES
90
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा : प्रतिनिधी

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

मुख्यमंत्री बळीराजा शिव पानंद रस्ता योजनेअंतर्गत मौजे घारगाव येथे रस्त्याची पाहणी व हद्दखुणा मोजणीचे काम उरकून आलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यास व्हॉट्सअ‍ॅपवर व्हाईस क्लिप पाठवून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अन्यथा जिल्हाभरात कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ ऑगस्ट २०२६ रोजी तहसीलदारांच्या आदेशानुसार उप अधीक्षक भूमी अभिलेख श्रीगोंदा कार्यालयातील प्र. परिरक्षण भूमापक वासुदेव छोटुलाल पाटील हे मौजे घारगाव येथे रस्ता मोजणी व हद्दखूण दाखवण्याच्या कामासाठी गेले होते. मोजणीचे काम पूर्ण झाल्यानंतर, त्याच दिवशी सायंकाळी सुमारे ४:४६ वाजता रस्त्यालगतचे खातेदार पोपट दशरथ खामकर यांनी पाटील यांच्या मोबाईलवर एक व्हॉट्सअ‍ॅप व्हाईस क्लिप पाठवली. या क्लिपमध्ये त्यांनी कर्मचाऱ्यास अश्लील शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी २ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या घटनेची चौकशी करून संशयित आरोपीवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यास अटक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास भूमी अभिलेख संघटनेतर्फे रीतसर कामबंद आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर भूमी अभिलेख विभागाचे अविनाश ठोकळ, शिंगाडे, वासुदेव पाटील, संगीता कापडणी, प्रतिभा करंजे, सुधीर देशमुख, फलके, लढाडे, कानीफ भापकर, आकाश परकाळे, सूफियान मोमिन, मानसी भैलुमे, अमृता पाटील, अंबादास जेजुरकर आणि सचिन बारस्कर यांच्या सह्या आहेत. सदर निवेदनाच्या प्रती महसूल मंत्री, जमाबंदी आयुक्त, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत.

Previous Post

🌿 निसर्गाच्या सानिध्यात जनजागृती …! 🌿

Next Post

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे.

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
45
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
49
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
31
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
73
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
14
Next Post
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे.

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In