• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सावित्रीच्या लेकींसाठी मानव विकास योजना निष्फळ!

Pratik Tidke by Pratik Tidke
September 3, 2026
in Blog
0
सावित्रीच्या लेकींसाठी मानव विकास योजना निष्फळ!
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा केविलवाणा प्रकार; आदिवासी विध्यार्थी एकता मंच अहेरी विधानसभा क्षेत्र युवा नेते कैलाशभाऊ कोरेत यांचा संताप

RelatedPosts

शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे सध्याची परिस्थिती निसर्गाने दुसरा संकट शेतकऱ्यांना टाकलआहे.

बेलापूरमध्ये ज्येष्ठांचा वाढदिवस व हृदयरोग मार्गदर्शन शिबीर संपन्न झाला या कार्यक्रमाची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात छापावी ही विनंती.

मॅट्रिकपूर्व शिष्यवृतीकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

प्रतिनिधी : सुगत उराडे
दि. २ सप्टेंबर २०२६

अहेरी : आलापल्ली येथे बाहेरगावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस गंभीर होत असून, मानव विकास योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या बससेवेचा विद्यार्थ्यांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.

शाळा सुटण्याची वेळ लक्षात घेता विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर सुट्टी देण्यात येत असली, तरी सुट्टी झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना बसची प्रतीक्षा करण्यासाठी तब्बल तीन तासांपर्यंत बसस्थानक परिसरात थांबावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. रात्री उशिरा बस येत असल्याने विद्यार्थ्यांचा मौल्यवान शैक्षणिक वेळ वाया जात असून, घरी पोहोचण्यासही मोठा विलंब होत आहे.

या प्रकाराचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. दिवसभर शिक्षण घेतल्यानंतर रात्री उशिरापर्यंत बसस्थानकावर थांबावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न

रात्र झाल्यानंतर बसस्थानक परिसरात विद्यार्थ्यांना थांबावे लागत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अंधारात विद्यार्थ्यांना असुरक्षिततेची भावना, मानसिक ताण आणि भीतीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मुली आणि लहान विद्यार्थ्यांना या परिस्थितीचा अधिक त्रास सहन करावा लागत असून, पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासोबतच त्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून बससेवा नियमित, वेळेवर आणि पुरेशा फेऱ्यांसह उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. बस उशिराने येण्याची समस्या तातडीने दूर करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व वेळेवर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत आहे.

अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

विद्यार्थ्यांच्या या गंभीर समस्येकडे प्रशासन व संबंधित विभागाने तातडीने लक्ष देऊन योग्य तो तोडगा काढावा. अन्यथा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सुरक्षिततेच्या प्रश्नासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आदिवासी विद्यार्थी एकता मंचाचे अहेरी विधानसभा क्षेत्रातील युवा नेते कैलाशभाऊ कोरेत यांनी दिला आहे.

Previous Post

बेलापूरमध्ये ज्येष्ठांचा वाढदिवस व हृदयरोग मार्गदर्शन शिबीर संपन्न झाला या कार्यक्रमाची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात छापावी ही विनंती.

Next Post

शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे सध्याची परिस्थिती निसर्गाने दुसरा संकट शेतकऱ्यांना टाकलआहे.

Related Posts

Blog

4
Blog

मॅट्रिकपूर्व शिष्यवृतीकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

September 3, 2026
2
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे.
Blog

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे.

September 3, 2026
13
श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यास जीवे मारण्याची धमकी! गुन्हा दाखल न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा
Blog

श्रीगोंदा भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यास जीवे मारण्याची धमकी! गुन्हा दाखल न झाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा

September 3, 2026
46
🌿 निसर्गाच्या सानिध्यात जनजागृती …! 🌿
Blog

🌿 निसर्गाच्या सानिध्यात जनजागृती …! 🌿

September 3, 2026
14
Next Post

शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे सध्याची परिस्थिती निसर्गाने दुसरा संकट शेतकऱ्यांना टाकलआहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे सध्याची परिस्थिती निसर्गाने दुसरा संकट शेतकऱ्यांना टाकलआहे.

September 3, 2026
सावित्रीच्या लेकींसाठी मानव विकास योजना निष्फळ!

सावित्रीच्या लेकींसाठी मानव विकास योजना निष्फळ!

September 3, 2026
बेलापूरमध्ये ज्येष्ठांचा वाढदिवस व हृदयरोग मार्गदर्शन शिबीर संपन्न झाला या कार्यक्रमाची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात छापावी ही विनंती.

बेलापूरमध्ये ज्येष्ठांचा वाढदिवस व हृदयरोग मार्गदर्शन शिबीर संपन्न झाला या कार्यक्रमाची बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात छापावी ही विनंती.

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In