• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे.

Pratik Tidke by Pratik Tidke
September 3, 2026
in Blog
0
साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे.
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

आपापल्या स्वभावानुसार प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने भगवंताची ओळख करून घेता येईल. मारुतीने दास्यत्वाने भक्ती केली. दशरथाने पुत्राप्रमाणे देवाला मानले. भगवंत माझा कसा होईल याचा आपण विचार करावा. भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वांत श्रेष्ठ साधन सांगितले आहे. मनुष्य जे प्रेम व्यसनात लावतो ते प्रेम भगवंताकडे लावले तर सर्व काम होते. हट्टी आणि व्यसनी माणसे एक प्रकारे चांगली. त्यांचे मन त्यांना सांगत असते की, व्यसनापायी आपल्या मुला-बाळांचेही नुकसान होत आहे. पण आपले व्यसन ते हट्टाने सोडीत नाहीत. हाच हट्ट किंवा निश्चय भगवंताकडे लावला की परमार्थ झाला ! माझे गुणदोष मी देवाला वाहिले की अर्पणभक्ती होते. आपण देवाची भक्ती करतो. परंतु त्या भक्तीत खरे प्रेम येत नाही; याचे कारण म्हणजे आपली दृष्टी चारी दिशांना फाकलेली असते. ती प्रथम एकाग्र करावी. थोडे करावे, पण एकाकार होऊन करावे.

RelatedPosts

माहूरच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्याची चर्चा!

वाघोत्रे येथे श्री दुर्गामाता दौडीचा उद्या समारोप

रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

परमार्थ कंटाळवाणेपणाने करू नये. आपल्या भावनेला व्यक्त व्हायला योग्य दिशा कशी मिळेल इकडे लक्ष द्यावे. परमात्मा पंढरपुरात आहे असे साधुसंत म्हणत आले, परंतु आपल्याला तो दगडच दिसतो, हा दोष कुणाचा ? आपल्या भावनेचाच. जशी भावना ठेवू तशी कृती होते. भगवंताजवळ आपला पूर्ण भाव ठेवावा. दिवा थोडा बाजूला झाला की वाट चुकते; म्हणून सतत भगवंताकडे नजर ठेवून वागावे. साधनावर सतत जोर द्यावा. तालासुरावाचून प्रेम येत नाही असे थोडेच आहे ? मी ज्याच्यापुढे भजन म्हणतो, तो ते ऐकतो या समजुतीने म्हटले म्हणजे झाले. भगवंताचाच मी आहे असे म्हणवून घ्यावे, त्याची कृपा केव्हा होईल ही तळमळ बाळगावी, आणि मी जे करतो ते मनापासून करतो की नाही हे पाहावे. झाल्यागेल्याचे दु:ख करू नका, उद्याची काळजी करू नका, आणि आजचे अनुसंधानही चुकवू नका. भगवंत साक्षात् पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे. प्रत्येक नामात ‘ भगवंत कर्ता ’ असे म्हणावे, म्हणजे अभिमान वाट अडवणार नाही. लाभहानीचे सुखदु:ख न वाटणे ही खरी भक्तीची प्रगती होय. देहाच्या कर्तव्याच्या मर्यादा सांभाळून, विषयातली वृत्ती भगवंताकडे लावणे, हेच खरे सीमोल्लंघन होय. जो अत्यंत आकुंचित आणि स्वार्थी आहे, तसेच जो ‘ माझ्या सुखाकरिता सर्व जग आहे ’ ही बुद्धी ठेवतो, तो मनुष्य अभिमानी समजावा. मनुष्य जितका स्वार्थी, तितका तो पराधीन असतो. पाचजणांपासून सुख मिळविण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच, आणि एकापासून सुख मिळविण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय.

’भगवंत आहे’ या भावनेपासून साधकाने सुरूवात करावी, आणि ’भगवंत आहेच’ या भावनेमध्ये समाप्ती करावी.

Ad 1
Previous Post

🌧️ काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

Next Post

शरद जोशी यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

Related Posts

Blog

माहूरच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्याची चर्चा!

October 19, 2026
5
वाघोत्रे येथे श्री दुर्गामाता दौडीचा उद्या समारोप
Blog

वाघोत्रे येथे श्री दुर्गामाता दौडीचा उद्या समारोप

October 19, 2026
28
रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन
Blog

रस्त्याच्या वादप्रकरणी माजी सैनिक सतीश काळे यांचे मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

October 19, 2026
9
वाई तहसीलदारांच्या कथित कारभाराविरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उपोषण
Blog

वाई तहसीलदारांच्या कथित कारभाराविरोधात पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उपोषण

October 19, 2026
5
शहादा पालिकेच्या कारभारावर नागरिकांची नाराजी; रस्ते आणि अतिक्रमणांच्या समस्यांनी शहरवासीय त्रस्त
Blog

शहादा पालिकेच्या कारभारावर नागरिकांची नाराजी; रस्ते आणि अतिक्रमणांच्या समस्यांनी शहरवासीय त्रस्त

October 19, 2026
5
सावर्डे विद्यालयात सरस्वती पूजन व घटस्थापना उत्साहात
Blog

सावर्डे विद्यालयात सरस्वती पूजन व घटस्थापना उत्साहात

October 19, 2026
7
Next Post

शरद जोशी यांच्या 91 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

ताज्या बातम्या

माहूरच्या आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्याची चर्चा!

October 19, 2026
कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

कांदिवलीत गरजू विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण

October 19, 2026

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीचा विजय; महाविकास आघाडीला १६ जागा

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In