• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

Pratik Tidke by Pratik Tidke
September 3, 2026
in Blog
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

महाराष्ट्रभरातून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकच मागणी!

RelatedPosts

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

अंगणवाडीची दुरावस्था; चिमुकल्यांना दुखापतीचा धोका

राजकीय पुढारी व त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या समर्थकांकडून जीवितास धोका ; प्रत्येक तालुका-जिल्ह्यातून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाचा एल्गार!

महाराष्ट्र | ता प्रतिनिधी
कुंदन तिवडकर

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेशजी कचकलवार यांच्या जीवितास काही राजकीय पुढारी तसेच त्यांच्या गुंड प्रवृत्तीच्या समर्थकांकडून धोका असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेचा गंभीरपणे विचार करून तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी जोरदार मागणी आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून करण्यात येत आहे.

पत्रकारिता, सामाजिक प्रश्न आणि जनतेच्या विविध समस्यांना वाचा फोडताना पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना अनेकदा दबाव, धमक्या आणि विरोधाला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, त्यांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होण्यापूर्वीच शासन व पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी संघटनेची मागणी आहे.

या मागणीसाठी निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यातून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना निवेदने देण्याचे सत्र सुरू असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

पत्रकारांच्या सुरक्षेबाबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी, तसेच श्री गणेशजी कचकलवार यांच्या सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनांद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे.
“धोका निर्माण होण्याची वाट पाहू नका!”
“एखादी गंभीर घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा त्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय अध्यक्षांच्या सुरक्षेबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा,” अशी भूमिका निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेने घेतली आहे.

महाराष्ट्रातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनेचे पदाधिकारी-सदस्य यांनी या मागणीला पाठिंबा देत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या सुरक्षेसाठी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

एकच मागणी — संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेशजी कचकलवार यांना सुरक्षा द्या, पत्रकारांचा आवाज सुरक्षित ठेवा!

श्री गणेशजी कचकलवार यांच्या सुरक्षेबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारी व निवेदनांची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना तात्काळ सुरक्षा देण्यात यावी ही मागणी संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे.

Previous Post

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

Related Posts

Blog

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026
0
Blog

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

September 3, 2026
0
Blog

अंगणवाडीची दुरावस्था; चिमुकल्यांना दुखापतीचा धोका

September 3, 2026
0
Blog

🦚🪈 परमार्थ निकेतनमध्ये भजनाने रंगणार श्रीकृष्ण जन्मोत्सव! 🪈

September 3, 2026
5
Blog

NCMC कार्ड सक्तीमुळे सॉफ्टवेअर त्रुटी व टॉप-अप न झाल्याने लाडक्या बहिणी व ज्येष्ठ नागरिकांना होणाऱ्या गैरसोय बद्ल नाराजी व्यक्त

September 3, 2026
1
Blog

अकोला जिल्हा कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा; हेक्टरी ५० हजार अनुदान द्याश्री शेतकरी राजा ग्रुप, पातूर तालुक्याची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

September 3, 2026
0

ताज्या बातम्या

निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्या!

September 3, 2026

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची जोरदार बॅटिंग! 🌧️

September 3, 2026

महामोर्चाला ‘सेवेची साथ’; स्व. दत्तात्रय जयराम ससाने बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श समाजोपयोगी उपक्रम

September 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In