📍 लोणावळा | प्रतिनिधी
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा परिसरात पावसाने पुन्हा जोर धरला असून, अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत.
पावसामुळे परिसरातील वातावरण पुन्हा एकदा आल्हाददायक झाले असून, डोंगर-दऱ्यांमध्ये धुक्याची चादर पसरली आहे. हिरवाईने नटलेला लोणावळ्याचा निसर्ग पावसामुळे आणखी खुलून दिसत आहे. 🌿🌧️
दरम्यान, मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता असून, नागरिकांनी तसेच वाहनचालकांनी काळजीपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
☔ पावसाची जोरदार बॅटिंग… आणि लोणावळ्याचा निसर्ग पुन्हा फुलला! 💚
