प्रेस नोट…
पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक तसेच पदभार समारंभ उत्साहात; शंभरावर पदाधिकाऱ्याचा नियुक्त्या…
हिंगणघाट : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक तसेच पदभार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी हिंगणघाट, समुद्रपूर व सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्राची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, विविध पदांवर शंभरपेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना यावेळी पदभार सोपवून आगामी काळात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचे आवाहन करण्यात आले. बूथ पातळीपासून संघटना बळकट करत पक्षाची विचारधारा तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच सर्वसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यावर भर देण्याचे मत वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी व्यक्त केले.
बैठकीस प्रदेश सरचिटणीस सुनील राऊत, आप नेते अनिल जवादे, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नावेद शेख, कृषी सेल जिल्हाध्यक्ष प्रभाकर रेवतकर, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष धनराज तेलंगे, युवक जिल्हाध्यक्ष प्रणव कदम, युवती जिल्हाध्यक्ष डॉ. माधवी पाटील, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, शहर अध्यक्ष बालू वानखेडे, संतोष तिमांडे, युवक प्रदेश सचिव प्रशांत लोणकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गौतम कोठारी व्यापारी सेल जिल्हाध्यक्ष, संजय नेहरोत्रा सेवादल जिल्हाध्यक्ष, ज्योती देशमुख महिला प्रदेश सचिव, योगिता इंगळे वर्धा जिल्हाध्यक्ष, विजय शर्मा ग्राहक संरक्षण सेल जिल्हाध्यक्ष, प्रवीण पेठे माजी सैनिक सेल जिल्हाध्यक्ष, हर्षल मुडे क्रीडा सेल जिल्हाध्यक्ष, शंकर महाजन ज्येष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष, उमेश नेवारे आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष, अनिल बुलानी,व्यापारी सेल शहराध्यक्ष, जितेंद्र कुकसे ओबीसी सेल विधानसभा अध्यक्ष, महेश झोटिंग पाटील हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष, सुनील डोंगरे जिल्हा उपाध्यक्ष, आशिष देवतळे जिल्हा उपाध्यक्ष, सुनील भुते जिल्हा कोषाध्यक्ष, राकेश चंदनखेडे समुद्रपूर तालुका अध्यक्ष, महादेव वांदिले तालुका उपाध्यक्ष, अनिल देशमुख तालुका उपाध्यक्ष, विनोद बाभुळकर तालुका उपाध्यक्ष, संजय लोणकर तालुका उपाध्यक्ष, अमोल बोरकर बूट कमिटी विधानसभा अध्यक्ष, प्रवीण श्रीवास्तव हिंगणघाट तालुका अध्यक्ष, गणेश वैरागडे समुद्रपूर तालुका अध्यक्ष, शुभांगी डोंगरे हिंगणघाट महिला शहर अध्यक्ष, कविता वानखेडे हिंगणघाट तालुका अध्यक्ष, शितल बोरकर हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष, मनीषा लोणकर शहर कार्याध्यक्ष, किरण चव्हाण शहर उपाध्यक्ष, पद्मा कोडापे शहर उपाध्यक्ष, वर्षा भोमले सिदी रेल्वे महिला शहर अध्यक्ष, स्नेहा उपाध्यय युवती जिल्हा उपाध्यक्ष, स्वाती लेदे युवती हिंगणघाट शहर अध्यक्ष, वैष्णवी मुळे युवती शहर उपाध्यक्ष, साची सांगोळे युवती तालुका अध्यक्ष, सुमित तळवेकर सिदी रेल्वे शहर अध्यक्ष, बंटी बेलखोडे शहर कार्याध्यक्ष, जगदीश बोरकर ओबीसी सेल सिंधी रेल्वे अध्यक्ष, तुषार हिंगणेकर युवक जिल्हा उपाध्यक्ष, धनराज झिलपे शहर सचिव, गजानन कलोडे वाहतूक सेल जिल्हा कार्याध्यक्ष, अन्सार मिर्झा जिल्हा उपाध्यक्ष, जितू रघाटाटे जिल्हा सरचिटणीस, सुनील घोडखंडे शहर सचिव, हेमंत घोडे विधानसभा अध्यक्ष, आकाश हुरले शहर अध्यक्ष, इमरान लाला शहर उपाध्यक्ष, संजय कांबळे तालुका अध्यक्ष, नदीम शेख अल्पसंख्यांक सेल जिल्हा उपाध्यक्ष, जावेद मिर्झा विधानसभा अध्यक्ष, सुधाकर वाढई किसान सेल जिल्हा उपाध्यक्ष, किशोर चांभारे जिल्हा उपाध्यक्ष, अंकित दांडेकर विधानसभा अध्यक्ष, मंगेश गीरडे समुद्रपूर तालुकाध्यक्ष, नरेश हरणे हिंगणघाट तालुकाध्यक्ष, नितीन भुते शहर सचिव, परम बावणे शहर उपाध्यक्ष, सुरेश बोकडे शहर उपाध्यक्ष, अमोल मुडे शहर उपाध्यक्ष, गुणवंत काळवटकर शहर अध्यक्ष सेवादल, देवा शेंडे शहर उपाध्यक्ष, राजू मेसेकर शहर उपाध्यक्ष, सतीश जनबंधू सामाजिक न्याय विभाग हिंगणघाट तालुका अध्यक्ष, अमर धनविज हिंगणघाट शहर अध्यक्ष, दिनेश नगराळे शहर कार्याध्यक्ष, सुरेश भगत समुद्रपूर शहर अध्यक्ष, संतोष घोडे समुद्रपूर तालूका अध्यक्ष, विकास बागेश्वर नदोरी सर्कल अध्यक्ष, संजय बोरेकर गिरड शहर अध्यक्ष, प्रभाकर चामचोर तालूका उपाध्यक्ष, कुंडलिक सहारे प. स. सर्कल अध्यक्ष गिरड, मंगेश बोरकुटे प. स. गिरड सर्कल अध्यक्ष, सुरेश गायकवाड कोरा सर्कल अध्यक्ष, मोतीबाबा झाडें जिल्हा उपाध्यक्ष सेवादल, विठ्ठल लेडे समुद्रपूर तालूका अध्यक्ष सेवादल, ईश्वर सुपारे तालूका सरचिटणीस, डॉ. प्रवीण खेडकर समुद्रपूर तालूका अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, हुकेश ढोकपांडे युवक हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष, राजू मुडे जिल्हा उपाध्यक्ष, विपुल थुल जिल्हा उपाध्यक्ष, शेखर ठाकरे जिल्हा उपाध्यक्ष सोशल मीडिया, सुशील घोडे जिल्हा सरचिटणीस, राहुल जाधव जिल्हा सचिव, अब्रार फारुकी हिंगणघाट तालूका अध्यक्ष, छोटू वानखेडे तालूका उपाध्यक्ष,पंकज विहिरकर समुद्रपूर तालूका अध्यक्ष, श्रीराम डेहने तालूका सचिव,सूरज खोंडे शहर अध्यक्ष, मयूर तपासे शहर उपाध्यक्ष, सुरेंद्र मुडे शहर उपाध्यक्ष,महेश सुपारे शुभम शिंदे तालूका उपाध्यक्ष शेकापूर सर्कल, रवीकिरण कुटे विद्यार्थी सेल जिल्हा कार्याध्यक्ष, अभिजित साबळे शहर सचिव, अनिकेत सुरकार विद्यार्थी तालूका अध्यक्ष यांची नियुक्ती पत्र देवून नियुक्ती करण्यात आली.
यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. आगामी काळात जनसंपर्क अभियान व विविध संघटनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढविण्याचा निर्धार करण्यात आला.







