• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

Pratik Tidke by Pratik Tidke
September 6, 2026
in Blog
0
अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

शिक्षकांची कमतरता दूर करण्यासह विषयतज्ज्ञ शिक्षक, डिजिटल शिक्षण व वसतिगृहातील सुविधांची मागणी;

RelatedPosts

शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालयात दहीहंडी उत्सव व भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन उत्साहात संपन्न.

महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना खोपोली शहर आयोजित दहीहंडी उत्सव २०२६

मालेगावमधील प्रत्येक भावाला आमदार भावनाताई गवळी यांच्याकडून प्रेमाची राखी भेट

आदिवासी विध्यार्थी एकता मंच अहेरी विधानसभा क्षेत्र आक्रमक

प्रतिनिधी : सुगत उराडे
दि. ५ सप्टेंबर २०२६

अहेरी : एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अखंडित शिक्षण मिळणे हा त्यांचा मूलभूत शैक्षणिक हक्क आहे. मात्र शिक्षकांची कमतरता, विषयतज्ज्ञ शिक्षकांचा अभाव तसेच विविध प्रशासकीय अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पर्यायी शैक्षणिक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी आदिवासी विद्यार्थी एकता मंच, अहेरी विधानसभा क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये आणि त्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणात कोणताही खंड पडू नये, यासाठी नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात पात्र शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत वरिष्ठ स्तरावर तातडीने पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली.

गणित, विज्ञान, इंग्रजीसाठी विषयतज्ज्ञ शिक्षकांची गरज

गणित, विज्ञान आणि इंग्रजी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांसाठी विषयतज्ज्ञ शिक्षक उपलब्ध करून द्यावेत. त्याचबरोबर ऑनलाइन शिक्षण, डिजिटल वर्ग आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक साहित्याची सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी, अशी मागणी मंचाच्या वतीने करण्यात आली.

अतिरिक्त तासिका व विशेष मार्गदर्शनावर भर

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अतिरिक्त तासिका, मार्गदर्शन वर्ग तसेच नियमित मूल्यमापनाची व्यवस्था करावी. ज्या विद्यार्थ्यांना एखाद्या विषयात अडचणी आहेत, त्यांच्यासाठी विशेष मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. शिक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती होईपर्यंत ही पर्यायी व्यवस्था अखंडितपणे सुरू ठेवावी, अशीही मागणी करण्यात आली.

वसतिगृहातील सुविधांकडेही लक्ष देण्याची मागणी

एकलव्य विद्यालयातील निवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता आणि सुविधांचा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला. वसतिगृहात स्वच्छता व्यवस्था प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याबरोबरच रात्रीच्या वेळेस निवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने प्रशासनाने केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता तातडीने ठोस निर्णय घ्यावा आणि विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी भूमिका आदिवासी विद्यार्थी एकता मंचाने मांडली.

यावेळी आदिवासी विद्यार्थी एकता मंचाचे युवा नेते कैलाशभाऊ कोरेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नागेश मडावी, माजी पंचायत समिती सदस्य मांतय्या आत्राम, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा विद्यालय समिती अध्यक्ष राकेश कुळमेथे, भीमा तलांडे, संतोष कोरेत, अनिल सूत्रपवार, एकलव्य विद्यालयाच्या प्राचार्या, अधीक्षक, शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

मौ. धामणगाव ता. जळकोट जि. लातूर येथे साहित्य सम्राट डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीच्या निमित्ताने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या..

Next Post

शिक्षक : राष्ट्राच्या भविष्याचा शिल्पकार

Related Posts

शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालयात दहीहंडी उत्सव व भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन उत्साहात संपन्न.
Blog

शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालयात दहीहंडी उत्सव व भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन उत्साहात संपन्न.

September 6, 2026
0
महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना खोपोली शहर आयोजित दहीहंडी उत्सव २०२६
Blog

महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना खोपोली शहर आयोजित दहीहंडी उत्सव २०२६

September 6, 2026
5
मालेगावमधील प्रत्येक भावाला आमदार भावनाताई गवळी यांच्याकडून प्रेमाची राखी भेट
Blog

मालेगावमधील प्रत्येक भावाला आमदार भावनाताई गवळी यांच्याकडून प्रेमाची राखी भेट

September 6, 2026
2
Blog

सासकल ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक 2027 ते 2031 सास्कल ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लोकनियुक्त सरपंच कोण होणार

September 6, 2026
20
Blog

पाच हजार मानधन तत्वावर निवडीसाठी कोणतेही नियम नाही?

September 6, 2026
9
परंपरेचा वारसा… गोविंदाच्या जल्लोषाला भक्तीची साथ!
Blog

परंपरेचा वारसा… गोविंदाच्या जल्लोषाला भक्तीची साथ!

September 6, 2026
1
Next Post

शिक्षक : राष्ट्राच्या भविष्याचा शिल्पकार

ताज्या बातम्या

शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालयात दहीहंडी उत्सव व भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन उत्साहात संपन्न.

शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे माध्यमिक विद्यालयात दहीहंडी उत्सव व भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन उत्साहात संपन्न.

September 6, 2026
महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना खोपोली शहर आयोजित दहीहंडी उत्सव २०२६

महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना खोपोली शहर आयोजित दहीहंडी उत्सव २०२६

September 6, 2026
मालेगावमधील प्रत्येक भावाला आमदार भावनाताई गवळी यांच्याकडून प्रेमाची राखी भेट

मालेगावमधील प्रत्येक भावाला आमदार भावनाताई गवळी यांच्याकडून प्रेमाची राखी भेट

September 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In