वार्ताहर प्रदीप रामचंद्र सताणे खालापूर तालुक्यातील खोपोली शहरातील शनिवार दि.५/८/२६ रोजी महेंद्र शेठ थोरवे फाऊंडेशन व शिवसेना खोपोली शहर आयोजित दहीहंडी उत्सव २०२६ मा . कर्जत खालापूर आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या विशेष सौजन्याने खोपोली शहरात ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा होत आहे तरी उत्सवाकरिता उपस्थित मा.नगराध्यक्ष साहेब आदरणीय.कुलंदीप शेंडे खोपोली नगरपरिषद आणि सर्व मा.नगरसेवक खोपोली नगरपरिषद,शिवसेना खोपोली शहर पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना युवा कार्यकर्ते तसेच महिला शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित असताना विशेष प्रमुख अतिथी म्हणून मा.खोपोली पोलीस निरीक्षक साहेब श्री.सचिनजी हिरे खोपोली पोलीस ठाणे यांची दहीहंडी उत्सवानिमित्त प्रामुख्याने उपस्थिती लाभली सामान्य जनसामान्यांच्या मदतीला त्यांच्या प्रत्येक सत्कार्यात मनपूर्वक मा.पोलीस निरीक्षक साहेब श्री.सचिन हिरे साहेब उपस्थित असतात म्हणून साहेबाचा जनसामान्याबददल कळवळा पाहून विशेष अभिमान कौतुक संपूर्ण रायगड जिल्ह्यात व्यक्त होत आहे मा.रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मॅडम श्री.आचल दलाल आणि अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री.अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यात उत्सवानिमित्त कोणतीही जीवितहानी व वादविवाद होऊ नये यासाठी विशेष दखल घेण्याचे आदेश देण्यात आले असता मा.पोलीस निरीक्षक श्री.सचिनजी हिरे साहेब यांनी त्वरित खोपोली शहरातील प्रत्येक दहीहंडी उत्सवाच्या ठिकठिकाणी जाऊन विशेष पाहणी करून खोपोली पोलीस ठाणेतील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आदेश देत कडक बंदोबस्तातात सतर्क राहण्याचे व कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तत्परतेने उपाययोजना करुन पोलीस कर्तव्य पार पाडण्याचे आदेश दिले आहे खोपोली शहरातील दहीहंडी उत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आलेले बालगोपाळ यांचे खोपोली नगरपरिषद मा.नगराध्यक्ष साहेब श्री.कुलदीप शेंडे आणि खोपोली नगरपरिषद सर्व मा. नगरसेवक तसेच शिवसेना खोपोली शहर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले आहे तसेच विजेत्यास सन्मानचिन्ह व विविध भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले आहे आणि प्रमुख विजेत्यांस स्कुटी गाडी देऊन सन्मानित करण्यात आले









