• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बुर्गीत ‘गडचिरोली महोत्सव २०२६’चा उत्साह; क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Pratik Tidke by Pratik Tidke
September 6, 2026
in Blog
0
बुर्गीत ‘गडचिरोली महोत्सव २०२६’चा उत्साह; क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
0
VIEWS
Ad 1

कबड्डी, व्हॉलीबॉल अन् पारंपरिक रेला नृत्याने रंगणार दोन दिवसीय महोत्सव; आदिवासी संस्कृतीच्या संवर्धनाचा पोलिसांचा पुढाकार

RelatedPosts

मारेगाव, आमदाराच्या कार्यक्रमातून दुचाकी लंपास

पुन्हा एकदा त्याच तरुणाचे पोलीस रेकॉर्डवर नाव, तरुणी बेपत्ता प्रकरणी मारेगाव, पोलीस स्टेशनला तक्रार…………

अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

आयोजक पोलीस मदत केंद्र बुर्गी

प्रतिनिधी : सुगत उराडे
बुर्गी (येमली), दि. ६ सप्टेंबर २०२६ :

गडचिरोली पोलीस दलाच्या *‘पोलीस दादालोरा खिडकी’ च्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘प्रोजेक्ट उडान’अंतर्गत ‘गडचिरोली महोत्सव २०२६’ला बुर्गी (येमली) येथे उत्साहात सुरुवात झाली. पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय महोत्सवात क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवात ‘वीर बाबुराव शेडमाके’ कबड्डी स्पर्धा, ‘भगवान बिरसा मुंडा’ व्हॉलीबॉल स्पर्धा तसेच आदिवासी पारंपरिक रेला नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ६ व ७ सप्टेंबर २०२६ रोजी पोलीस मदत केंद्र, बुर्गी (येमली) येथे या स्पर्धा पार पडत आहेत.

या स्पर्धांमध्ये परिसरातील बुर्गी, येमली, करपणफुंडी, गुंडापुरी, बिड्री, मंगुठा, पैमा, कांदोळी, उडेरा, कोंदावाही, मरकल आदी गावांतील विविध संघ व नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

आदिवासी संस्कृतीला जपण्याचा संदेश

क्रीडा स्पर्धांसोबतच पारंपरिक रेला नृत्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आल्याने आदिवासी समाजाची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपण्यास आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यास हातभार लागणार आहे. ‘आदिवासी संस्कृती ही आमची शान, त्यांचा सन्मान हीच आमची ओळख’ या भावनेतून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

“खेळातून निर्माण होतो निरोगी समाज आणि सुरक्षित उद्याचा पाया,” या संदेशातून युवकांना क्रीडा क्षेत्राकडे वळविण्यासोबतच सामाजिक सलोखा आणि सुरक्षिततेचा संदेशही देण्यात येत आहे.

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती

कार्यक्रमास PSI तुषार जाधव, प्रभारी अधिकारी, पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली), PSI आशिष पंधरे, ASI टाकळीकर (SRPF-७) तसेच पोलीस मदत केंद्र बुर्गी (येमली)चे सर्व अंमलदार आणि SRPF ग्रुप-७चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पोलीस पाटील विजय मडावी (बिड्री), पोलीस पाटील विनोद हिचामी (बुर्गी), पोलीस पाटील अनिल मडावी (येमली), सामाजिक कार्यकर्ता सुगत उराडे (बुर्गी), टेकाम मेजर, उरेते मेजर, उईके मेजर, दुपारे मेजर, गावडे मेजर यांच्यासह जिल्हा पोलीस दलातील पुरुष व महिला कर्मचारी, SRPFचे जवान तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रीडा, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या महोत्सवामुळे बुर्गी परिसरा

Previous Post

शिक्षक दिन उत्साहात साजरा

Next Post

अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

Related Posts

Blog

मारेगाव, आमदाराच्या कार्यक्रमातून दुचाकी लंपास

September 6, 2026
0
Blog

पुन्हा एकदा त्याच तरुणाचे पोलीस रेकॉर्डवर नाव, तरुणी बेपत्ता प्रकरणी मारेगाव, पोलीस स्टेशनला तक्रार…………

September 6, 2026
2

11
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही शिक्षकांचे स्थान अबाधित !
Blog

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही शिक्षकांचे स्थान अबाधित !

September 6, 2026
7
Blog

चिखलदरातिल कलाल कुंडमधे अमरावती चे नृत्य शिक्षक विपिन मनोहर गोर(वय ३५ वर्षे)यांचा मृत्यु झाला आहे.

September 6, 2026
0
Next Post
अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

ताज्या बातम्या

मारेगाव, आमदाराच्या कार्यक्रमातून दुचाकी लंपास

September 6, 2026

पुन्हा एकदा त्याच तरुणाचे पोलीस रेकॉर्डवर नाव, तरुणी बेपत्ता प्रकरणी मारेगाव, पोलीस स्टेशनला तक्रार…………

September 6, 2026
अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

अहेरी एकलव्य विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी पर्यायी शैक्षणिक व्यवस्था तातडीने करा!

September 6, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In