प्रतिनिधी:दरीकांत कोळेकर
कुरुंदवाड :- शाळा एक मंदिर आहे, विध्यार्थी माझे दैवत आहे यांचे भान शिक्षकांनी राखले पाहिजे, एकमेकांना मदत केली पाहिजे, शिरोळ तालुक्यात कुरुंदवाड शहरातील 1917 साली स्थापन झालेल्या कुमार विद्यामंदिर कुरुंदवाड शाळा क्रमांक 1 या स्वातंत्र्य पूर्व काळातील ऐतिहासिक शाळेची गळतीने विद्यार्थी संख्या कमी झाल्याने शाळा बंद पडण्याची स्थिती मध्ये आली असून शाळेला पुन्हा गतवैभय प्राप्त करणेसाठी प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागेल, शहरातील सामाजिक प्रतिष्ठित व ज्येष्ठ नागरिक तसेच सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षणतज्ञ यांची प्राथमिक बैठक घेऊन विध्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी कोण – कोणते उपाय योजना राबविता येतील याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन जे आपल्याला सहज सुलभ नवनवीन उपक्रम राबविता येतील, तसेच शासकीय पातळीवर वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली चर्चा करणे, समजा एकाद्या जिल्हा परिषद शाळेत पटसंख्या वाढली असेल म्हणजे कमीत- कमी 35 विध्यार्थी संख्या प्रवेशित प्राप्त झाली किंवा 20 ते 25 विध्यार्थी नेहमी उपस्थित असतील तर त्यास एक शिक्षक संच मान्यतेने मिळू शकते.
जी जादाची पटसंख्या झाली असेल तर ती ज्या जि. प. प्राथमिक शाळेत कमी असतील तेथे वर्ग करावेत म्हणजे ती ही शाळा.आणि शिक्षक ही टिकेल,हा विचार केला पाहिजे,म्हणजे अतिरिक्त शिक्षक होणार नाहीत, आणि खाजगी मानधन तत्वावर कर्मचारी भरु नये, जिल्हा परिषदेच्या कोणत्याही शाळेत भरमसाठ फी घेऊन शिक्षण देऊ नये. आणि जे असे फी घेऊन शाळा चालवितात त्यांच्यावर कारवाई केले पाहिजे, जे नागरिक फी देऊन आपल्या पाल्याला शाळेत प्रवेश घेतात त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल परंतु जे गरीब आहेत मोलमजूर करणारे असतील ज्यांना फी देणे परवडत नाही अशा विध्यार्थ्यांना मग प्रवेश नाकारता येणार नाही, मग मुलाच्यात दुजाभाव निर्माण होऊ शकतो, मी फी देतो मग त्याला चांगले शिक्षण आणि जे फी देणार नाहीत त्यांना वेगळे शिक्षण असे होता कामा नये R T E ऍक्ट नुसार कोणास ही प्रवेशापासून वंचित ठेवता येत नाही, प्रवेश नाकारता येत नाही.
ज्या पालकांच्या घरी शैक्षणिक वातावरण चांगले असेल ती मुले आपोआप घडू शकतात. पण ज्यांच्या घरी शिक्षण म्हणजे काय माहीतच नसेल त्या पाल्यानी काय करावे.खरी कस येथे आहे, अशा मुलांना चांगले शिक्षण दिले तरच आवाहन पेलले असे मत होऊ शकते. ज्या जि प शाळेची भौतिक सुविधा पूर्ण असतील आणि त्यांनी चांगले कार्य केले म्हणून त्याच शाळेस आणखीन जास्तीचा निधी देऊ नका तीच निधी जवळच्या जि प शाळेस द्या, म्हणजे तीही शाळा त्या शाळेच्या समतोल भौतिक सुविधेस पात्र होईल, सामान्य मुलांना कठीण्य संपादणूक पातळीवर नेले पाहिजे, यासाठी प्रशिक्षित शिक्षक नेमावा, नवनवीन युक्त्या शोधून मुलांना चांगले घडवावे म्हणजे पालकांचा ओघ वाढेल. पटसंख्या वाढील. जी मुले घडलीत त्यांची नावे, पुरस्कार द्या, पालकत्व स्वीकारा, देणगी घ्या, त्यांचा जमा -खर्च ठेवा,
इतर जि प शाळेना भेटी द्या, पालक मेळावे भरवा, वाद – संवाद करा, चांगले – वाईट अभिप्राय द्या, दर शनिवारी एक तास मिटिंग घ्या केलेल्या कामाची तुलना करा, कायम एकच ठिकाणी शिक्षक ठेऊ नका, परिस्थिती नुसार बदल करा, काम हे केलेच पाहिजे, नुसता पाट्या टाकायचे काम करू नका, शिक्षकी पेशाला वाहून घेणारा शिक्षक पाहिजे म्हणजे शाळा ठिकते,बैठकीला वार्ड प्रमुख, शाळा व्यवस्थापन सदस्य, बाकी वरती नमूद केल्याप्रमाणे सगळ्या घटकानी मिळून निर्णय घ्या,
बैठकीत शाळेची विद्यार्थीसंख्या वाढविणे, शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, पालकांचा विश्वास संपादन करणे आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांना या शाळेकडे आकर्षित करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देणे,यासाठी लवकरच शाळेच्या माजी विद्याथ्यांची व्यापक बैठक आयोजित करा, पुढील दिशा निश्चित करा, चांगली नावारूपाला असलेली शाळा बंद पडणे म्हणजे फार गंभीर बाब आहे अशा शाळेची विद्यार्थीसंख्या कमी होणे ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. शाळेचा वारसा जपण्यासाठी नागरिक आणि माजी विद्याध्यांनी एकत्र येऊन तिच्या विकासासाठी पुढाकार घेऊ विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी माजी विद्यार्थी, पालक, नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक यांनी एकत्र येऊन ठोस कृती आराखडा तयार करून आपली ऐतिहासिक शाळा टिकवण्यासाठी सर्वांनी जबाबदारी घेऊया.
शाळा जून महिन्यात सुरु होते तत्पूर्वी मार्च, एप्रिल मे, जून या महिन्यात विध्यार्थी शोध मोहीम रावबिंली पाहिजे, शिक्षकांनी देखील सक्रिय सहभाग दाखविला पाहिजे, एकमेकांस सहाय्य करू अवघे धरू सुपन्थ. या युक्ती प्रमाणे एकमेकांना मदत केली पाहिजे, जबाबदारीची जाण असली पाहिजे तरच भविष्यात शाळा टिकतील नाही तर सरकार पण खाजगीकरण करू पाहतेय, टाटा, बिर्ला, अदानी यांना देऊन खाजगी करण होऊन असा सर्व शाळा बंद होतील. गरिबांच्या मुलांना शिक्षण घेणे फार जिक्कीरीचे होईल. यांचा विचार करायला पाहिजे,








