प्रतिनिधी- दरीकांत कोळेकर.
कुरुंदवाड :- समस्त बौद्ध समाज कुरुंदवाडच्या वतीने
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व सुशोभन करणे करिता निधी उपलब्ध करून देण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. शहरातील मुख्य चौकात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम संत गतीने सुरू असून स्ट्रक्चर पूर्णत्वाला आले आहे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरील मेमोरियल पूर्ण करण्याकरिता सत्यवादी मेमोरियल ला ताबडतोब निधी उपलब्ध करून द्यावा याबाबतचे निवेदन मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांना निवेदन देण्यात आले . यावेळी समस्त बौद्ध समाज कुरुंदवाड च्या वतीने धम्मपाल गौतम ढाले,शाहीर आवळे, सुनील कुरुंदवाडे वपारस ढाले.व समस्त बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
शहरातील मुख्य चौकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्णकृती पुतळा बसण्याचे काम पूर्ण करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने केली असून उर्वरित काम महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील मेमोरियल ला निधी अभावी काम रखडलेले आहे तरी मेमोरियल ला पूर्ण नेण्यासाठी सत्यवादी मेमोरियल ला ताबडतोब निधी उपलब्ध करून द्यावा आणखीन जवळपास 18 लाख रुपये अंदाजित लागतील असा कयास वर्तवण्यात येत आहे. जवळपास दोन ते तीन महिने शासनाकडे पाठपुरावा केला असता निधी अभावी काम रखडल्याचे सांगण्यात येत आहे. निधी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समाज बांधवांनी दिलेला आहे.
याकामी पाठपुरावा केला असता फक्त आश्वासणाची खैरात देण्यात येत आहे. दोन ते तीन महिने झाले काम संत गतीने सुरू असून यासाठी नगरपालिका प्रशासनाने लक्ष घालून काम पूर्णत्वाला जावे. याकरिता या आशयाचे निवेदन आज पुन्हा एकदा मुख्याधिकारी, कुरुंदवाड नगर परिषद कुरुंदवाड यांना देण्यात आले.









