• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश!

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश!
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

RelatedPosts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

अमेझॉन-गुगलचे अधिकारी असल्याचे भासवून परदेशी नागरिकांना गंडा; तब्बल ३० जणांना अटक!

📍 लोणावळा | नांगरगाव

लोणावळा शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत मौजे नांगरगाव हद्दीतील ओमेगा सोसायटी परिसरातील ‘डेव व्हिला’ येथे सुरू असलेल्या कथित बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांतील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या तब्बल ३० जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

🔴 अमेझॉन-गुगलच्या नावाचा गैरवापर!

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून लोणावळ्यातील ‘डेव व्हिला’ भाड्याने घेतला आणि तेथे बेकायदेशीर कॉल सेंटर सुरू केले होते. इंटरनेट, मोबाईल आणि लॅपटॉपच्या माध्यमातून परदेशी नागरिकांशी संपर्क साधून आरोपी स्वतःला अमेझॉन, गुगल यांसारख्या नामांकित कंपन्यांचे अधिकारी असल्याचे भासवत असल्याचा आरोप आहे.

परदेशी नागरिकांच्या संगणकात अथवा खात्यांमध्ये अंमली पदार्थ (ड्रग्ज) सापडल्याचे सांगून त्यांच्यामध्ये भीती निर्माण केली जात होती. त्यानंतर ही भीती दाखवून संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

💳 क्रेडिट कार्ड आणि ATMची माहितीही मिळवली जात असल्याचा आरोप

याशिवाय नागरिकांकडून क्रेडिट कार्ड, ATM कार्ड तसेच इतर गोपनीय आर्थिक माहिती मिळवून फसवणूक केली जात असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

या गुन्ह्यातून मिळालेली रक्कम हवाला आणि क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून भारतीय चलनात रूपांतरित केली जात असल्याचा पोलिसांना संशय असून, या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे.

💥 लॅपटॉप, मोबाईल, वाहने आणि रोकड जप्त

या धडक कारवाईत पोलिसांनी लॅपटॉप, मोबाईल फोन, वाहने आणि रोख रक्कम असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला आहे.

👮‍♂️ ३० आरोपींविरोधात गुन्हे दाखल

या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार बाळासाहेब अरुण खवडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण ३० आरोपींविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अमान इम्तियाज शेख, मो. फैज उर्फ नाजिश आरिफ शेख, मोहम्मद अफजल शेख, कुलदीप मनोज बागडी, रिहान सलीम घनानी, मोहम्मद अलीरजा सय्यद, तावीश मेहबूब अली शेख, कामरान इसामुद्दीन शेख, सद्वामानंद खान, सुजल खुमबहादुर राणा, अब्दुल आहाद मोहम्मद रफिक खान, झहिय वाहिद खान, जाहीद आजम शेख, धनराज देवजीत बोस, शादाब जायद सय्यद, इरफान अब्दुल गफूर शेख (कॉल सेंटर मालक), समीर इरफान शेख, इरशाद इरफान शेख, अमीर सिराज खान आणि मसूदन शमीम चौधरी यांच्यासह इतर आरोपींचा समावेश आहे.

⚖️ न्यायालयाकडून १ दिवसांची पोलीस कोठडी

अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

🚔 लोणावळा पोलिसांची मोठी धडक कारवाई!

लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण लोकरे आणि पोलीस पथकाने ही धडक कारवाई केली.

आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) आणि इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

🔎 या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे? किती कोटींचे व्यवहार झाले?

या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणाचे हात आहेत, या कॉल सेंटरमधून किती मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले आणि फसवणुकीची व्याप्ती किती आहे, याचा सखोल तपास पोलीस निरीक्षक महेश विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

⚠️ लोणावळ्यात परदेशी नागरिकांना लक्ष्य करणारे बनावट कॉल सेंटर नेमके किती दिवसांपासून सुरू होते? या रॅकेटमागे आणखी किती जण आहेत, हे पोलीस तपासातून समोर येणार आहे.

Ad 1
Previous Post

वाकडे बंधूंचे दातृत्व; वाढदिवसानिमित्त मंगरूळ नवघरे शाळेला लाखमोलाची भेट!

Next Post

नाशिक: अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत १५१ किलो अन्नपदार्थ जप्त.

Related Posts

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!
Blog

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
1
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 
Blog

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
2
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.
Blog

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026
1
तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम
Blog

तालुका गुहागर कोळवली बंदर वाडी तील एका सुंदर बदलाला मनापासून सलाम

October 16, 2026
1
कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!
Blog

कुलदैवत वडिलोपार्जित घरत कुटुंबीय खारपाडा यांच्या तर्फे नवरात्रोत्सव उत्सव मोठया उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न..!

October 16, 2026
17
जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी
Blog

जिल्ह्यात बोअरवेल व विहिरींच्या नवीन खोदकामावर तात्पुरती बंदी

October 16, 2026
1
Next Post
नाशिक: अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत १५१ किलो अन्नपदार्थ जप्त.

नाशिक: अजमेरी बेकरीवर अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईत १५१ किलो अन्नपदार्थ जप्त.

ताज्या बातम्या

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते महेश धायगुडे यांना नियुक्तीपत्र प्रदान!

October 16, 2026
चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

चांदूर रेल्वे येथे श्री. परिक्षित जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे ‘मत वाचवा – देश वाचवा’ जनआंदोलन; तहसीलदारामार्फत मा. पंतप्रधानांना निवेदन सादर 

October 16, 2026
*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

*घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची तरी समाजा साठी लढा.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In