• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वांगीतील दारू दुकानफोडीचा गुन्हा २४ तासांत उघडकीस; चौघांना अटक

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
0
SHARES
60
VIEWS
Ad 1
Ad 1

चिंचणी वांगी पोलिसांची धडक कारवाई; १ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त

RelatedPosts

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

एरंडगाव येथे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वानराचा मृत्यू

चिंचणी , ता. कडेगाव : वांगी (ता. कडेगाव) येथील दारू दुकान फोडून मद्यसाठा चोरणाऱ्या दोघांना चिंचणी वांगी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १० वाजल्यापासून ते दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या दरम्यान वांगी गावातील कडेपूर रोडलगत असलेल्या देशी दारूच्या दुकानात चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या लाकडी दरवाजाची कडी कोयंडा कापून आत प्रवेश केला आणि सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या मद्यसाठ्यासह इतर साहित्य चोरून नेले.

या घटनेची माहिती मिळताच चिंचणी वांगी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गोपनीय माहिती आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना २४ तासांच्या आत ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार व तपास पथकाने केली.

चिंचणी वांगी पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून, परिसरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

Ad 1
Previous Post

मंडणगडजवळील तुळशी घाटात बोलेरो उलटून भीषण अपघात; ८ प्रवासी गंभीर जखमी

Next Post

अंगणवाडी मदतनीस भरतीत कथित अनियमितता!

Related Posts

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.
Blog

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

October 16, 2026
0
राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती
Blog

राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

October 16, 2026
0
Blog

एरंडगाव येथे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वानराचा मृत्यू

October 16, 2026
3
अन्यायाविरुद्ध लढणारा लेखणीचा निखारा विझला ; मिलिंद कीर्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Blog

अन्यायाविरुद्ध लढणारा लेखणीचा निखारा विझला ; मिलिंद कीर्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली

October 16, 2026
3
गाव तिथे शाखा शाखा तिथे संघटन पक्षबाधणीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा सुजात आंबेडकर
Blog

गाव तिथे शाखा शाखा तिथे संघटन पक्षबाधणीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा सुजात आंबेडकर

October 16, 2026
1
विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व !
Blog

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व !

October 16, 2026
0
Next Post

अंगणवाडी मदतनीस भरतीत कथित अनियमितता!

ताज्या बातम्या

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

October 16, 2026
राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

October 16, 2026

एरंडगाव येथे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वानराचा मृत्यू

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In