• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मंडणगडजवळील तुळशी घाटात बोलेरो उलटून भीषण अपघात; ८ प्रवासी गंभीर जखमी

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

स्टेअरिंगचा बॉल जॉइंट तुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती | स्थानिक नागरिकांकडून देवदूतासारखी मदत

RelatedPosts

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

एरंडगाव येथे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वानराचा मृत्यू

मंडणगड/रत्नागिरी (तालुका प्रतिनिधी:राकेश.चिलबे.)

मंडणगड तालुक्यातील आंबडवे-लोणंद मार्गावरील पालेकोंड-तुळशी दरम्यान गुरुवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास बोलेरो गाडीचा (क्र. MH 08 W 8295) भीषण अपघात झाला. गाडीचे स्टेअरिंग लॉक झाल्याने बोलेरो थेट डाव्या बाजूला उलटून हा अपघात घडला, ज्यामध्ये जावळे गावातील तब्बल ८ प्रवासी जखमी झाले आहेत.

स्टेअरिंग लॉक झाल्याने घडला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, जावळे गावाहून मंडणगडकडे येत असताना तुळशी घाटात अचानक वाहनाच्या स्टेअरिंगचा बॉल जॉइंट तुटला आणि स्टेअरिंग लॉक झाले. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बोलेरो रस्त्याच्या डाव्या बाजूला उलटली.

अपघातातील जखमींची नावे:

या भीषण अपघातात जावळे गावातील खालील नागरिक जखमी झाले आहेत:
गीता महाडिक
सुचिता भानसे
शिवानी शिगवण.
आदित्य पवार.
सायली पवार.
कमलाकर भानसे.
सिद्धी भानसे.
सुजाता शिगवण.

स्थानिक नागरिक अन् राजकीय कार्यकर्त्यांचा मदतीचा हात

अपघाताची बातमी समजताच स्थानिक नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आणि जखमींच्या नातेवाइकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका बोलावून जखमींना तातडीने प्रथमोपचारासाठी मंडणगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या मदतकार्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंडणगड युवक तालुकाध्यक्ष श्री. साईराज सावंत, ज्येष्ठ नेते भाईसाहेब, शहराध्यक्ष श्री. वैभव कोकाटे, वैभव भानसे, वसिम चिपोळे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

पुढील उपचारासाठी माणगाव व मुंबई येथे हलवले

मंडणगड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींची प्रकृती लक्षात घेता, पुढील उपचारासाठी त्यांना माणगाव आणि मुंबई येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

संकटाच्या वेळी स्थानिक नागरिकांनी दाखवलेली तत्परता आणि माणुसकीचे दर्शन या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले आहे.

Ad 1
Previous Post

माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या दि.15 ऑक्टोबर 2026 रोजी असलेल्या 95 व्या जयंतीनिमित्त व ‘वाचन प्रेरणा दिनानिमित्त’ साहित्यिक व कवी प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

Next Post

वांगीतील दारू दुकानफोडीचा गुन्हा २४ तासांत उघडकीस; चौघांना अटक

Related Posts

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.
Blog

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

October 16, 2026
0
राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती
Blog

राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

October 16, 2026
0
Blog

एरंडगाव येथे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वानराचा मृत्यू

October 16, 2026
4
अन्यायाविरुद्ध लढणारा लेखणीचा निखारा विझला ; मिलिंद कीर्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Blog

अन्यायाविरुद्ध लढणारा लेखणीचा निखारा विझला ; मिलिंद कीर्ती यांना भावपूर्ण श्रद्धांजली

October 16, 2026
3
गाव तिथे शाखा शाखा तिथे संघटन पक्षबाधणीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा सुजात आंबेडकर
Blog

गाव तिथे शाखा शाखा तिथे संघटन पक्षबाधणीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा सुजात आंबेडकर

October 16, 2026
1
विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व !
Blog

विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व !

October 16, 2026
0
Next Post

वांगीतील दारू दुकानफोडीचा गुन्हा २४ तासांत उघडकीस; चौघांना अटक

ताज्या बातम्या

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन उत्साहात साजरा.

October 16, 2026
राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

राजुरीत फार्मासिस्ट रॅलीतून प्रतिजैविकांच्या योग्य वापराबाबत जनजागृती

October 16, 2026

एरंडगाव येथे विद्युत प्रवाहाचा धक्का लागून वानराचा मृत्यू

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In