पातुर तालुका प्रतिनिधी
गोपाल चंदनसे
सावरगाव हिवरा वसान म्हणून ओळखलेल्या जाणाऱ्या शेत शिवारातील विहिरीवरील कनेक्शन बंद असल्यामुळे फळ बाग शेतकरी अडचणीत पडला आहे , या शिवारातील 3 विद्युत खांब कोसळून पडलेले आहेत आणि त्यावरील तारा ह्या चोरीला गेल्या आहेत त्यामुळे हिवरा शिवारातील विहिरीवरील वीज कनेक्शन बंद आहेत त्यात फळ बाग असलेल्या शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे , वीजच नाही तर शेतकरी उभे असलेल्या फळ बागांना पाणी कसे देईल , उभे असलेले फळ पिके ही सुकून जात आहेत त्यात शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे , तेव्हा खंडित असलेला वीज पुरवठा हा लवकरात लवकर चालू करावा अशी विनंती तेथील शेतकरी गजानन चिपडे, अनिल चिपडे, प्रवीण इंगळे , सु. मो. चिपडे, प्रशांत इंगळे यांनी सस्ती येथे दिलेल्या निवेदनात केली आहे.
माझ्या शेतात केळीचे पीक आहे आणि ते परिपक्व अवस्थेत आहेत माझ्या तोंडी आलेला घास हा हिरवल्या जात आहे , त्याला जर लवकरात लवकर पाणी मिळाले नाही तर माझे खूप मोठे नुकसान होईल गजानन चिपडे
पदवीधर शेतकरी उमरा
तेव्हा महावितरण विभागाने लवकरात लवकर लक्ष देऊन शेतकऱ्याची मदत करावी शेतकरी दुष्काळा मुळे आधीच होरपळून निघालेला आहे.










