• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्री साईबाबा संस्‍थान (शिर्डी) आयोजित सोमवार, दि १९ ते बुधवार दि २१ ऑक्‍टोबर २०२६ या काळात श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा होणार..

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
श्री साईबाबा संस्‍थान (शिर्डी) आयोजित सोमवार, दि १९ ते बुधवार दि २१ ऑक्‍टोबर २०२६ या काळात श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा होणार..
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

शिर्डी-राजेंद्र दुनबळे

RelatedPosts

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

नाशिक विभागात नाशिक जिल्ह्यातील १३ तालुके ट्रिगर-१ व ट्रिगर-२ मध्ये घेतले आहेत, त्यात चांदवडचा समावेश

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी सोमवार, दिनांक १९ ऑक्‍टोबर ते बुधवार दिनांक २१ ऑक्‍टोबर २०२६ या काळात श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा होत असून, या उत्‍सवात सर्व साईभक्‍तांनी मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे, असे आवाहन संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी केली आहे.
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०८ वा श्री पुण्‍यतिथी उत्‍सवाची तयारी पुर्ण झाली आहे. संस्‍थानकडून १ लाख ६६ हजार ५८५ भक्‍तमंडळ सभासदांना श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या निमंत्रण पत्रिका पाठविण्‍यात आलेल्‍या असून १ लाख ९९ हजार देणगीदार साईभक्‍तांना E-mail द्वारे देखील आंमत्रित करण्‍यात आलेले आहे. श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवानिमित्‍त गुजरात येथील दानशुर साईभक्‍त‍ श्रीमती ममता सतिष कपिलेश्‍वरकर यांच्‍या देणगीतून मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात येणार आहे तसेच मुंबई -शिर्डी येथील साई व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व “साईद्वारकाधिश” हा भव्य व आकर्षक देखावा.” गेट क्र. ४ चे प्रवेशव्‍दाराशेजारी उभारण्‍यात येत आहे तसेच, या उत्‍सवकाळात विविध धार्मिक व सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.


श्री गाडीलकर म्‍हणाले, जगभरात श्री साईबाबांचे लाखो साईभक्‍त आहेत. हे साईभक्‍त श्री पुण्‍यतिथी सोहळ्यानिमित्‍त आपल्‍या सदगुरुंचा आशिर्वाद ग्रहण करण्‍याकरीता शिर्डीला येतात. त्‍यामुळे श्रींच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरासह चावडी समोर, मारुती मंदिर ते शामसुंदर हॉल, समाधी मंदिराच्‍या दक्षिण बाजुकडील पालखी मार्ग, साई उद्यान परिसर व नविन श्री साईप्रसादालय परिसर आदि ठिकाणी ६५ हजार चौरस फुटाचे मंडप तसेच अतिरिक्‍त निवासव्‍यवस्‍थेसाठी भक्‍त निवासस्‍थान येथे २९ हजार चौरस फुटाचा असा एकुण साधारणत: ९४ हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्‍यात आले आहे. संस्‍थानचे सर्व निवासस्‍थान येथे एकुण १७,७५९ साईभक्‍तांची निवास व्‍यवस्‍था होणार आहे. तसेच तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात साधारणतः ५,००० साईभक्‍तांची निवास व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे.


श्री साईबाबा पुण्यतिथी उत्‍सवाकरीता श्री साई प्रसादालयामध्‍ये उत्‍सवाचे पहिल्‍या (प्रारंभ) दिवशी गुलाब जामुन, दुसरे (मुख्‍य) दिवशी खीर, तिसरे (सांगता) दिवशी बालुशाही हे मिष्‍ठान्‍न म्‍हणून प्रसाद भोजनात देणेत येणार आहे. तसेच साईभक्‍तांकरीता सुमारे १७० क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद व मोफत बुंदी प्रसाद पाकीटे तयार करण्‍यात येणार असून उत्‍सव कालावधीत भक्‍तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्‍ध व्‍हावे यासाठी वेगवगळया ०८ ठिकाणी नवीन दर्शनरांग, श्री साईनाथ मंगल कार्यालय, साईकॉम्‍पलेक्‍स, गेट नं.०४ जवळ आतील बाजु, व्‍दारकामाई समोरील खुले नाटयगृह, सेवाधाम, श्री साईप्रसादालय व सबका मालिक एक मार्केट आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र सुरु राहणार आहेत. तसेच आवश्‍यकता भासल्‍यास अतिरिक्‍त लाडू विक्री केंद्र उभारण्‍याचे नियोजन करण्‍यात आलेले आहे. दर्शनरांगेत व परिसरात भक्‍तांना चहा, कॉफी व दुध सुलभतेने मिळावे यासाठी साई कॉम्‍प्‍लेक्‍स, साईआश्रम, धर्मशाळा, भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम), व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान तसेच साई उद्यान इमारत परिसर, शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांगेत तळमाळा व पहिल्‍या माळ्यावर चहा व कॉफीची अतिरिक्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.

उत्‍सव काळात भक्‍तांच्‍या सोयीसाठी साधारण ०८ ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु करण्‍यात आलेले आहे. गुरुस्‍थान मंदिरासमोर दिक्षीत वाडा, दर्शनरांग, नविन भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम), साईआश्रम, श्री साईप्रसादालय व मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडप आदि ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असून तातडीचे सेवेसाठी मंदिर परिसरात, नविन भक्‍तनिवासस्‍थान व नविन श्री साईप्रसादालय येथे रुग्‍णवाहीका तैनात ठेवण्‍यात येणार आहे. तसेच संस्‍थानच्‍या वतीने श्री साईबाबा मंदिर, मंदिर परिसर, सर्व निवासस्‍थाने, श्री साईप्रसादालय आदी ठिकाणी सुरक्षा व्‍यवस्‍था ठेवण्‍यात येणार आहे.


श्रींच्‍या पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी सोमवार, दिनांक १९ ऑक्‍टोबर रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणुक, पहाटे ०६.०० वाजता व्‍दारकामाईत श्री साईसच्‍चरिताचे अखंड पारायणास सुरुवात, पहाटे ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती, दुपारी ०१.०० ते ०३.०० यावेळेत सौ. अश्विनी सरदेशमुख यांचा ‘स्‍वरांजली संगीत सेवा’ कार्यक्रम, दुपारी ०४.०० वाजता ह.भ.प. सौ. राधिका गोपालकृष्‍ण कालेकर, कोल्‍हापुर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम तर सायंकाळी ०६.०० वाजता धुपारती होईल. रात्रौ ०७.०० ते ०९.३० यावेळेत श्री. मधुसुदन भुवड, बोरिवली यांचा ‘साईराम संगीत संध्‍या’ हा कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून श्रीं चे पालखीची मिरवणूक होणार आहे. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती (पालखी मिरवणुक परत आल्‍यानंतर) होणार आहे. उत्‍सवाचा हा पहिला दिवस असल्‍यामुळे अखंड पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहील.
उत्‍सवाचे पारायणात अध्‍याय वाचनासाठी भाग घेऊ इच्छिणारे साईभक्‍तांनी रविवार, दि. १८ ऑक्‍टोबर रोजी दुपारी ०१ ते सायंकाळी ०५.१५ वाजेपर्यंत देणगी काऊंटर नंबर १ येथे आपली नावे नोंदवावीत. नांव नोंदणी केलेल्‍या साईभक्‍तांची त्‍याच दिवशी संध्‍याकाळी ०५.२० वाजता समाधी मंदिरातील स्‍टेजवर चिठ्ठया काढुन ( ड्रॉ पध्‍दतीने ) अध्‍याय वाचनासाठी निवड केली जाईल व उर्वरीत चिठ्ठ्यांमधुन विणाधारकांची नावे निवडण्‍यात येतील. त्‍यानंतर भाग्‍यवान अध्‍याय वाचकांची व विणाधारकांची नांवे व्‍दारकामाईचे बाहेरील दर्शनीय भागात व समाधी मंदिराचे उत्‍तर बाजूचे फलकावर लावले जातील.


उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी मंगळवार, दिनांक २० ऑक्‍टोबर रोजी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता अखंड पारायण समाप्‍ती, श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०७.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी ०७.३० वाजता श्रींचे समाधी मंदिरावरील सुवर्ण कळसाला यावर्षी ७४ वर्ष पूर्ण होऊन ७५ अमृत महोत्‍सवी वर्ष सुरू होत असल्‍याने श्रींचे समाधी मंदिर सुवर्ण कलशारोहण अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्‍यानंतर सकाळी ०९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता ह.भ.प. सौ. राधिका गोपालकृष्‍ण कालेकर, कोल्‍हापुर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम, तसेच सकाळी १०.३० वाजता श्रींचे समाधी समोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती तर दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत श्री गौतम अरोरा, दिल्‍ली यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. श्री रोहित दुग्‍गल, श्रीरामपुर यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम, सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन कार्यक्रम, सायंकाळी ०६.०० वाजता धुपारती होईल. सायं.०७.३० ते १०.०० वा. संगीत दिग्‍दर्शक व गायक श्री राम शंकर, मुंबई यांचा ‘साईभजन’ कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून श्रींच्‍या रथाची मिरवणूक होणार आहे. रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.३० यावेळेत श्रींच्‍या समोर कलाकार हजेरी कार्यक्रम होईल. तर उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्‍यामुळे दिनांक २० ऑक्‍टोबर रोजी रात्रौ १०.०० वाजता होणारी शेजारती व २१ ऑक्‍टोबर रोजी पहाटेची ०५.१५ वाजता होणारी काकड आरती होणार नाही.
ज्‍या साईभक्‍तांना भिक्षाझोळी कार्यक्रमात भाग घ्‍यावयाचा असेल त्‍यांनी आपली नावे सोमवार दि. १९ ऑक्‍टोबर रोजी सकाळी ०८ ते ११.३० या कालावधीत देणगी काऊंटर नंबर १ येथे नोंदवावीत. नांव नोंदणी केलेल्‍या साईभक्‍तांची त्‍याच दिवशी समाधी मंदिरातील स्‍टेजवर दुपारी १.०० चे दरम्‍यान ड्रॉ पध्‍दतीने चिठ्ठया काढण्‍यात येतील व भाग्‍यवान भिक्षा झोळीधारकांची नांवे जाहिर केली जातील. हि नावे समाधी मंदिराचे बाहेरील उत्‍तर बाजूचे फलकावर लावणेत येतील.


उत्‍सवाच्‍या तृतीय (सांगता) दिवशी बुधवार, दिनांक २१ ऑक्‍टोबर रोजी पहाटे ०५.५० वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०६.५० वाजता श्रींची पाद्यपुजा, व सकाळी ०७.०० वाजता गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी १०.०० ते १२.०० वाजता ह.भ.प. सौ. राधिका गोपालकृष्‍ण कालेकर, कोल्‍हापुर यांचा गोपालकाला किर्तन व दहिहंडी कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजेच्‍या दरम्‍यान श्रींची माध्‍यान्‍ह आरती होईल. दुपारी ०१.०० ते ०३.०० सौ. पद्मावती पारेकर, निनाद ग्रृप, पुणे यांचा ‘भक्‍ती संगीत’ कार्यक्रम, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. पद्मश्री विजय घाटे यांचा ‘तालचक्र’ कार्यक्रम, तसेच सायंकाळी ०६.०० वाजता श्रींची धुपारती, सायं. ०७.०० ते ०९.३० यावेळेत श्री राजेश कृष्‍णा खर्डे (वेसावकर), मुंबई यांचा ‘परंपरा साईंची’ कार्यक्रम होईल. तर, रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल. उत्‍सवकाळात कीर्तन कार्यक्रम आणि निमंत्रीत कलाकारांचे कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर होणार आहे.
तसेच उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी मंगळवार २० ऑक्‍टोबर रोजी रात्रौ १०.०० ते ०५.३० यावेळेत होणा-या कलाकारांच्‍या हजेरी कार्यक्रमासाठी इच्‍छुक कलाकारांनी आपली नावे त्‍याच दिवशी अनाऊंसमेंट रुम येथे आगाऊ नोंदवावीत, असे सांगुन उत्‍सवाच्‍या कालावधीत श्री साईसत्‍यव्रत पुजा (सत्‍यनारायण पुजा), अभिषेक पुजा व वाहन पुजा बंद ठेवण्‍यात येणार असल्‍याचे ही श्री गाडीलकर यांनी सांगितले.
हा उत्‍सव यशस्‍वरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश शिवाजी कचरे, तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया, भा.प्र.से. व मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्‍नशिल आहे.

Ad 1
Previous Post

नागपुरातील नामांकित शाकाहारी हॉटेलच्या रोटीमध्ये दोरीसदृश पदार्थ आढळल्याचा खळबळजनक आरोप!

Next Post

औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचा भव्य पक्षप्रवेश सोहळा; शेकडो युवकांचा पक्षात प्रवेश

Related Posts

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
0
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
3
Blog

नाशिक विभागात नाशिक जिल्ह्यातील १३ तालुके ट्रिगर-१ व ट्रिगर-२ मध्ये घेतले आहेत, त्यात चांदवडचा समावेश

October 16, 2026
1
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात संपन्न; सामाजिक प्रश्नांवर प्रा. वसंत हंकारे यांचे परखड भाष्यनऊ कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा’ म्हणून सन्मान; हजारोंच्या जनसमुदायाची उपस्थिती
Blog

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात संपन्न; सामाजिक प्रश्नांवर प्रा. वसंत हंकारे यांचे परखड भाष्यनऊ कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा’ म्हणून सन्मान; हजारोंच्या जनसमुदायाची उपस्थिती

October 16, 2026
1
ताकडगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी युवकांचे आमरण उपोषण
Blog

ताकडगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी युवकांचे आमरण उपोषण

October 16, 2026
4
जनहितासाठी सात दिवस अन्नत्याग, दारुभट्टीवर जेसीबी चालवली आंदोलक राहुल तिवारींसह ३९ जणांवर गुन्हे दाखल
Blog

जनहितासाठी सात दिवस अन्नत्याग, दारुभट्टीवर जेसीबी चालवली आंदोलक राहुल तिवारींसह ३९ जणांवर गुन्हे दाखल

October 16, 2026
2
Next Post
औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचा भव्य पक्षप्रवेश सोहळा; शेकडो युवकांचा पक्षात प्रवेश

औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचा भव्य पक्षप्रवेश सोहळा; शेकडो युवकांचा पक्षात प्रवेश

ताज्या बातम्या

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026

नाशिक विभागात नाशिक जिल्ह्यातील १३ तालुके ट्रिगर-१ व ट्रिगर-२ मध्ये घेतले आहेत, त्यात चांदवडचा समावेश

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In