सोलापूर : सोलापूर जिल्हा गट सचिव संघटनेच्या जनरल सेक्रेटरीपदी भालचंद्र भिकाजी उपासे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भालचंद्र भिकाजी उपासे यांच्या निवडीमुळे गट सचिव संघटनेच्या कार्याला अधिक बळ मिळेल, तसेच गट सचिवांच्या विविध प्रश्नांना व अडचणींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निवडीप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुका उपाध्यक्ष शिवाजी उपासे, समाधान काळे, राधेश्याम पाटील, उद्धव नाईकनवरे, महेश उपासे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी भालचंद्र भिकाजी उपासे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.










