• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

धर्मांतर घोषणा वर्धापन दिन तीन आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला..

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
धर्मांतर घोषणा वर्धापन दिन तीन आंबेडकरांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला..
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

———————असंविधानिक धर्मांतर विरोधी कायद्याच्या विरोधात कोर्टात जाणार – डॉ भीमराव य आंबेडकर ———————– येवला जि. नाशिक – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ९१ वर्षांपूर्वी दिनांक १३ ऑक्टोबर १९३५ रोजी मी हिंदू म्हणून जन्माला आलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा ज्या ठिकाणी केली त्या येवला मुक्ती भूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसादर नातू डॉ भीमराव यशवंत आंबेडकर, पनतू सुजात प्रकाश आंबेडकर व अमन आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ( भारतीय बौध्द महासभा, नाशिक पश्चिम जिल्हा, नाशिक पूर्व जिल्हा पुरुष आणि महिला शाखेच्यावतीने येवला मुक्तीभूमीवर धर्मांतर घोषणा वर्धापन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी ऍड डॉ एस के भंडारे ( ट्रस्टी / केंद्रीय कार्यालय प्रमुख व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ), यु जी बोराडे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ) मुक्तीभूमी येवला ट्रस्टी देवेंद्र उबाळे यांची भाषणे झाली.

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

प्रमुख मार्गदर्शनात डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आपल्या सविस्तर भाषणात प्रामुख्याने असे म्हणाले की, भारतीय संविधानाने समता प्रस्थापित केली असली तरी,देशाचे सर्वोच्य पद असलेल्या राष्ट्रपती महोदयांना त्या आदिवासी असल्याने मंदिरात प्रवेश नाकारला गेला हे आणि इतर उदाहरणे सांगून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ साला पासून सुरु केलेला समतेचा संघर्ष अजून संपलेला नाही त्यासाठी आपणास संघर्ष करावा लागेल तसेच संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला कलम २५ नुसार धार्मिक स्वातंत्र्य दिले असताना महाराष्ट्र सरकारने धर्मांतर विरोधी कायदा काढून संविधानिक अधिकार नाकारला असल्याने या असंविधानिक धर्मांतर विरोधी कायद्याच्या विरोधात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कोर्टात जाणार असल्याचे जाहीर केले.

आद.सुजात दादा आंबेडकर यांनी साहिल वाकोडे यांचे उदाहरण देऊन तरुणांवरील अन्याय अत्याचार कसे होत आहेत याकडे लक्ष वेधले, आजच्या परिस्थिती दुष्काळ ग्रस्त शेतकरी यांच्यासाठी कुंभमेळ्यासाठीचे बजेट दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांच्यासाठी वळविण्यात यावा असे सरकारला आवाहन केले आणि आंबेडकरी समाज व तरुणांनी एकजूट दाखवून आंबेडकर विचाराचा पक्ष मजबूत करावा असे सरांवशाने सांगितले.

आद.ऍड अमन आंबेडकर यांनी, आम्ही आंबेडकर विचारावर, समाजावर घाला आला तर आंबेडकर घराणे एकत्रच असून आम्ही दोन पनतूच्या नादी लागू नये असे विरोधकांना बजावले.

या सभेच्या अध्यक्षस्थानी नाशिक पश्चिम जिल्हा अध्यक्ष कृष्णाजी सोनवणे होते. सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस शरद भोगे यांनी केले. स्वागत अध्यक्षा वनिताताई मोरे (महिला जिल्हाध्यक्षा पश्चिम), संदीप खरे (जिल्हाध्यक्ष पूर्व), लतिकाताई निरभवने (पूर्व जिल्हाध्यक्षा) होत्या आणि प्रास्ताविक व आभार रितेश गांगुर्डे (कोषाध्यक्ष) यांनी केले..

नाशिक जिल्हा पश्चिम शाखेच्या वतीने दिनांक ०४/१०/२०२६ ते दिनांक १३/१०/२०२६ रोजी आयोजित केलेल्या बौद्धाचार्य – श्रामणेर शिबिराचा समारोप व त्यातील ४० शिबिरार्थी यांचे प्रमाणपत्रे डॉ भीमराव आंबेडकर यांनी कार्यक्रमात वाटप केले. यावेळी भन्ते धम्मानंद बोधी,भंते बी सुमेध बोधी, बी एच गायकवाड ( राष्ट्रीय सचिव ), भिकाजी कांबळे (राष्ट्रीय सचिव ) अशोक केदारे (सरचिटणीस महाराष्ट्र राज्य) गौरव पवार (संघटक महाराष्ट्र राज्य) वंचितचे चेतन गांगुर्डे,रिपब्लिकन सेनेचे अविनाश शिंदे, , बुद्धिस्ट ग्राम विकास अधिकारी संघाचे अध्यक्ष बापूसाहेब सादवे व जमधाडे सर,केंद्रीय शिक्षक प्रकाश जगताप, केंद्रीय शिक्षक मनोज गाडे, शिबिरासाठी १० दिवस सेवा देणारे प्रल्हाद उघडे, मनोज मोरे (संस्कार उपाध्यक्ष) , सत्यभामाताई राव (सरचिटणीस नाशिक पश्चिम) ,

मेजर एकनाथ भालेराव, गौरव साळवे,नेहा दीपक, अरुण जाधव, बाजीराव गायकवाड, विजयकुमार गजभिये, भाऊलाल कटारे, रवींद्र सोनवणे, प्रकाशकुमार मधुकर मोरे, भगवान बच्छाव इत्यादी उपस्थित होते. ———————— सकाळच्या सत्रात ऍड डॉ एस के भंडारे यांच्या हस्ते समता सैनिक दल ध्वजाचे ध्वजारोहण करून समता सैनिक दलाच्या कबड्डी, धावणे व लाठी काठी स्पर्धा संपन्न झाल्या. त्यानंतर शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला डॉ भीमराव आंबेडकर, ऍड अमन आंबेडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भिकखू संघ, समता सैनिक दल, कार्यकर्ते व आंबेडकरी जनता यांची भव्य रॅली येवला शहरातून मुक्तीभूमी पर्यंत काढण्यात आली. मुक्ती भूमीवर समता सैनिक दलाचे संचालन करण्यात येऊन येथील बुद्धिस्ट ग्रामपंचायत अधिकारी संघाच्यावतीने उभारण्यात आलेला ५६ फूट उंचीचा धम्म ध्वजाचे ध्वजारोहन डॉ भीमराव य आंबेडकर व ऍड अमन आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. समता सैनिक दलाच्या स्पर्धा आणि संचालनाचे नियोजन समता सैनिक दलाचे डी एम आचार्य,पी एस ढोबळे,उमेश बागुल,रमेश वाघमारे,कॅप्टन राजाभाऊ आठवले, रविंद्र इंगळे, राजरत्न थोरात, आनंदा भेरजे, सुरेश गजभारे, एकनाथ भालेराव, निलेश पवार इत्यादीनी केले.

हा धर्मांतर दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाशिक पश्चिम जिल्हा कार्यकारणी येवला तालुका दीपक गरुड, रामभाऊ केदारे, प्रवीण खळे, येवला तालुका कार्यकारणी निफाड, सिन्नर, इगतपुरी, नाशिक, चांदवड, त्र्यंबक, दिंडोरी, नाशिक शहर, सिडको शहर,आणि सर्व बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक शिक्षिका समता सैनिक दल नाशिक बटालियन यांनी परिश्रम घेतले..

Ad 1
Previous Post

70 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

Next Post

जनहितासाठी सात दिवस अन्नत्याग, दारुभट्टीवर जेसीबी चालवली आंदोलक राहुल तिवारींसह ३९ जणांवर गुन्हे दाखल

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
0
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
0
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
2
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
2
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
5
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
4
Next Post
जनहितासाठी सात दिवस अन्नत्याग, दारुभट्टीवर जेसीबी चालवली आंदोलक राहुल तिवारींसह ३९ जणांवर गुन्हे दाखल

जनहितासाठी सात दिवस अन्नत्याग, दारुभट्टीवर जेसीबी चालवली आंदोलक राहुल तिवारींसह ३९ जणांवर गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In