• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात संपन्न; सामाजिक प्रश्नांवर प्रा. वसंत हंकारे यांचे परखड भाष्यनऊ कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा’ म्हणून सन्मान; हजारोंच्या जनसमुदायाची उपस्थिती

Pratik Tidke by Pratik Tidke
October 16, 2026
in Blog
0
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात संपन्न; सामाजिक प्रश्नांवर प्रा. वसंत हंकारे यांचे परखड भाष्यनऊ कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा’ म्हणून सन्मान; हजारोंच्या जनसमुदायाची उपस्थिती
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठान, जामनेर यांच्या वतीने आयोजित ‘जागर दुर्गाशक्तीचा’ या कार्यक्रमात प्रा. वसंत हंकारे यांनी तरुणाईसमोरील गंभीर सामाजिक प्रश्नांवर परखड भाष्य केले. तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता, मुलींच्या पलायनाचे वाढते प्रमाण, मोबाईल न मिळाल्याने टोकाचे निर्णय घेण्याच्या घटना तसेच तरुणांमधील वाढती हिंसक प्रवृत्ती आणि खुनांच्या घटनांबाबत त्यांनी समाजाने गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन केले.

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

आई-वडिलांच्या त्यागाची जाणीव तरुणाईला व्हावी, या उद्देशाने हंकारे यांनी आई आणि वडिलांचे जीवनातील महत्त्व भावनिक शब्दांत उलगडून सांगितले. वडिलांचे कष्ट, त्याग आणि मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी घेतलेले अपार परिश्रम यांची जाणीव करून देताना त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. आईचे प्रेम, तिचा त्याग आणि तिचे आयुष्यातील अनमोल स्थान समजावून सांगताना सभागृहातील अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी आपल्या कुटुंबाप्रती असलेली कर्तव्ये ओळखून जबाबदारीने वागावे, असा संदेश त्यांनी दिला.

नऊ कर्तृत्ववान महिलांचा ‘नवदुर्गा’ म्हणून सन्मान

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे समाजातील विविध क्षेत्रांत संघर्षातून आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या नऊ महिलांचा करण्यात आलेला सन्मान. साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या हस्ते या महिलांचा गौरव करण्यात आला.

यामध्ये घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी महिला, बँकेसाठी पिग्मी संकलनाचे काम करणारी महिला, गोंधळी शिवून मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडणारी महिला, सेवा केंद्र चालवणारी महिला, शेतात मजुरी करून संसाराला हातभार लावणारी महिला, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून यश मिळवणारी युवती तसेच नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदापर्यंत पोहोचलेल्या लोकप्रतिनिधींच्या कार्याचा गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांतील या नऊ दुर्गांचा सन्मान करून प्रतिष्ठानने महिलांच्या कष्टांचा, संघर्षाचा आणि कर्तृत्वाचा गौरव केला.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला 64 समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन, जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे, श्याम चैतन्य महाराज उपस्थित होते. साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानचे राहुल चव्हाण यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमामागील सामाजिक भूमिका मांडली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत वाघ सर आणि जगदीश बैरागी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नाना सातवे, ईश्वर पवार, डॉ. विनोद भोई, ईश्वर चवरे, जितेंद्र कुमावत, संतोष सोनवणे, मयूर पवार सर, गणेश चौधरी, शुभम निकम, अनमोल माळी, जयवंत पर्वते, ईश्वर चौधरी, शंकर सातवे, भारत ठाकरे तसेच श्री मॉर्निंग ग्रुपचे सहकार्य लाभले.

जामनेर शहरातील सर्व समाजाने या कार्यक्रमाला गांभीर्याने घेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी प्रयत्न केले.सामाजिक प्रश्नांवर जागृती, पालकांविषयी कृतज्ञतेची भावना आणि महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव या त्रिसूत्रीच्या माध्यमातून ‘जागर दुर्गाशक्तीचा’ या उपक्रमाने जामनेरमध्ये सामाजिक प्रबोधनाचा संदेश दिला.

Ad 1
Previous Post

ताकडगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी युवकांचे आमरण उपोषण

Next Post

नाशिक विभागात नाशिक जिल्ह्यातील १३ तालुके ट्रिगर-१ व ट्रिगर-२ मध्ये घेतले आहेत, त्यात चांदवडचा समावेश

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
5
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
2
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
20
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
3
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
5
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
5
Next Post

नाशिक विभागात नाशिक जिल्ह्यातील १३ तालुके ट्रिगर-१ व ट्रिगर-२ मध्ये घेतले आहेत, त्यात चांदवडचा समावेश

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In