🔴 BREAKING NEWS | चांदवड साठी मोठी खुशखबर चांदवड तालुका ट्रिगर-१ मध्ये, शासनाचा GR जारी
चांदवड (प्रतिनिधी): चांदवड राज्य शासनाने अखेर चांदवड तालुक्याला खरीप हंगाम २०२६ च्या पीक विमा योजनेच्या ट्रिगर-१ मध्ये समाविष्ट केले आहे. यासंदर्भातील शासन निर्णय क्रमांक समिती-२०२६/प्र.क्र.८२/मदत-२, दिनांक १४.१०.२०२६ सोबतचे परिशिष्ट-१ जाहीर करण्यात आले आहे.
या GR नुसार नाशिक महसूल विभागातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला, देवळा, त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाड या १३ तालुक्यांमध्ये प्रथम कळ (Trigger-1) व दुसरी कळ (Trigger-2) लागू करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोठा दिलासा मिळणार असून, अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या यशाबद्दल चांदवड तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या वतीने आमदार डॉ. राहुल आहेर व पाठपुरा करणारे सव॔ नेते व तहसिल काया॔लयापुढे उपोषनासाठी बसलेले सव॔ शेतकरी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
“चांदवड ट्रिगर-१ मध्ये – यश









