लातूर जिल्ह्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या अत्यंत गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात मा. जिल्हाधिकारी यांच्या समवेत सविस्तर व सकारात्मक बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये दुष्काळ निवारणासाठी तातडीने राबवायची अल्पकालीन धोरणे (Short Term Policies) तसेच पाण्याचा व शेतीचा शाश्वत विकास साधणारी दीर्घकालीन धोरणे (Long Term Policies) यांवर प्रशासनासोबत सखोल चर्चा करून सर्वसमावेशक मागण्या मांडण्यात आल्या.
बैठकीतील प्रमुख मुद्दे व मागण्या:
१. शेतकऱ्यांना दसरा व दिवाळीच्या काळात थेट आर्थिक मदत व पीक विम्याची रक्कम तात्काळ वितरित करावी.
२. पशुधन वाचवण्यासाठी तातडीने चारा छावण्या / चारा बँक सुरू कराव्यात.
३. जलसंधारणाच्या कामांतून रोजगार हमी योजनेअंतर्गत स्थानिक शेतकरी व मजुरांना रोजगार उपलब्ध करावा.
४. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी विशेष आर्थिक तरतूद करावी.
५. महिलांच्या नावावरील स्मॉल फायनान्स व इतर कर्जांच्या सक्तीच्या परतफेडीबाबत धोरणात्मक दिलासा द्यावा.
६. ऊसतोडणी यंत्रांऐवजी मजुरांना प्राधान्य देऊन रोजगार व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवावा.
७. सूक्ष्म सिंचनासाठी (तुषार व ठिबक) १००% अनुदान, धरणांमधील गाळ काढणे व पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करावी.
८. ग्रामीण पशुधन उद्योजकता आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन देऊन शेतीपूरक रोजगारनिर्मिती करावी.
बळीराजावर सध्या अस्मानी संकट ओढवला आहे. या संकटकाळात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर असून लवकरात लवकर त्यांना भरीव मदत मिळेल, हा विश्वास आहे.
यावेळी निलंगा पंचायत समितीच्या सभापती सुनिताताई वाघमारे, शिरूर अनंतपाळ पंचायत समितीचे सभापती संजयजी सूर्यवंशी, देवणी पंचायत समितीच्या सभापती अंकिताताई पाटील, नगराध्यक्ष संजयराजजी हलगरकर, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष माधवजी बिराजदार, देवणी तालुकाध्यक्ष शिवराजजी अण्णा बिराजदार, दगडूजी सोळुंके, संजयजी दोरवे, बाळासाहेब शिंगाडे, गोविंदजी चिलकुरे, प्रशांतजी पाटील, रतनजी शिवणे, गणेशजी धुमाळे, डॉ. संतोषजी वाघमारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.बातमीदार-
श्री महेश मधुकरराव सरतापे









