तहसीलदार व पुरवठा अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे; आठ दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन
माढा, जि. सोलापूर : माढा तालुक्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात आणि नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे माढा तालुका युवक अध्यक्ष बालाजी (मामा) बारबोले पाटील यांनी बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले होते.
या आंदोलनस्थळी संबंधित अधिकाऱ्यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. पुरवठा अधिकारी पवार साहेब यांनी हे निवेदन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आल्याची माहिती दिली. तसेच माढा तालुक्यात चारा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आठ दिवसांत आवश्यक कार्यवाही केली जाईल,








