. दिनांक 17 /10 /2016 वेळ सकाळी 9:00 वाजता या शिबीराला सुरुवात झाली. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री घाडगे एन. आर.यांनी प्रास्ताविककेले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता गाढवे विधीज्ञ वकील संघटना भूम यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश श्री भगवान पंडित (सचिव तालुका विधी सेवा समिती भूम .) कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणूनन्यायाधीश श्री आर डी डांगे साहेब त्याचबरोबर श्री भारत बोर्डे पोलीस उपाधीक्षक तसेच वकील संघ भूम चे अध्यक्ष सुकाळे साहेब उपस्थित होते. अध्यक्ष भाषणामध्ये न्यायाधीश श्री भगवान पंडित साहेब यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती सांगितली विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व तसेच वेळेचे महत्व शिस्तीचे महत्व बरीच उदाहरणे देऊन सांगितले. बाल गुन्हेगारी, बालविवाह, रहदारीचे नियम, लैंगिक शोषण, गुन्हेगारी इत्यादी विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गटशिक्षण कार्यालयाचे केंद्रप्रमुख श्री म्हेत्रे सर यांनी केले.









