• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी

Pratik Tidke by Pratik Tidke
October 18, 2026
in Blog
0
हरसूल भागात भातपिकाच्या नुकसानीची पाहणी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी

RelatedPosts

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी

खरीप हा एकमेव हंगाम आणि त्यात पिकवले जाणारे भात हे मुख्य पीक यंदा पावसाच्या अभावाने हिरावले गेले आहे. हरसूल परिसरात कापणीला आलेले भात पीक पावसाअभावी शेतातच जळून करपल्याने शेतकरी आणि शेतमजूर पूर्णपणे हवालदिल झाले आहेत. या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज निर्माण झाली आहे.

या गंभीर नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य विनायक माळेकर व युवा नेते मिथुन राऊत यांनी हरसूल भागातील बेलापाली येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणीदरम्यान कृषी विभागाचे अधिकारी अशोक कडूल यांनी तांत्रिक बाबींची माहिती दिली. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी व्यथा मांडताना सांगितले की, “पाऊस न पडल्याने उभे पीक जळून खाक झाले असून, मजुरीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत शासनाने आम्हाला वाऱ्यावर सोडू नये.”

यावर विनायक माळेकर व मिथुन राऊत यांनी प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई व दुष्काळी मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.

“शेतात कापणीला आलेले पीक उभे जळून करपून गेले आहे. त्याचा जनावरांना चारा म्हणूनही उपयोग उरलेला नाही. सोंगणीचा हंगाम वाया गेल्याने शेतमजुरांच्या हाताला काम उरलेले नाही. ही अत्यंत दयनीय अवस्था असून, शासनाने तातडीने मदत जाहीर करणे गरजेचे आहे.”

— विठ्ठल राऊत, युवा नेते, त्र्यंबकेश्वर

या पाहणीप्रसंगी हरसूल सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण मेये, पोलीस पाटील सुनील पवार, रामदास घटक, विनायक मेये, मोहन लाडवन, रामदास गावित, राजेश मेये, प्रकाश तेलम यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

गडचिरोलीत भाजपचा पदवीधरांचा मेळावा संपन्न,बावनकुळेची उपस्थिती

Next Post

मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात

Related Posts

Blog

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
1
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम
Blog

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
4
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी
Blog

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026
12
🏆 रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये शिरपेचात सर्वोच्च मानाचा आणखी एक तुरा! 🏆

8
Next Post
मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात

मांजरा धरणात केवळ ८.७२% पाणीसाठा; अवैध उपसा रोखण्यासाठी पथके तैनात

ताज्या बातम्या

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

नवरात्रोत्सवानिमित्त मुळावा येथील रेणुका माता मंदिरात भाविकांची मांदियाळी

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In