बीड, धाराशिव व लातूरची तहान भागवणाऱ्या मांजरा धरणात १५ ऑक्टोबरपर्यंत केवळ ८.७२ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.वाढत्या ऑक्टोबर हीटमुळे धरणातून दररोज ०.०८५ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने जलसंकट अधिकच गहिरे झाले आहे.
पावसाअभावी उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले असून, सिंचनावरील उपसा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अवैध उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने आता चार भरारी पथके तैनात केली आहेत. बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांचे साहित्य जप्त करून त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल केले जातील, असा कडक इशारा धरण अभियंता नामदेव घोडके यांनी दिला आहे.
प्रतिनिधी सागर काळे









