• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 18, 2026
in Blog
0
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

२५ जागांसाठी ५० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; उद्या १९ ऑक्टोबरला ३२ टेबलांवर मतमोजणी

भुदरगड प्रतिनिधी

RelatedPosts

सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

महिलांना स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर

कोल्हापूर : आशिया खंडातील अग्रगण्य आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज, १८ ऑक्टोबर रोजी चुरशीच्या वातावरणात मतदान पार पडले. या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान झाल्याचा दावा करण्यात आला असून, संचालक मंडळाच्या २५ जागांसाठी रिंगणात असलेल्या ५० उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. उद्या, १९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

३५ मतदान केंद्रांवर चुरशीची लढत

कोल्हापूर जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये एकूण ३५ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी एकूण ५ हजार ४१८ पात्र ठरावधारक मतदार होते. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून प्रयत्न करण्यात आले. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांशी संबंधित हसन मुश्रीफ, महाडिक व नरके गट यांच्यात प्रमुख लढत होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

मतमोजणी प्रक्रियेतील बदलामुळे उत्सुकता वाढली

निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या नियोजनानुसार मतमोजणी प्रक्रियेत मतपत्रिका एकत्रित करून मिसळल्यानंतर मोजण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तालुकानिहाय मतदानाचा अंदाज घेणे आणि कोणत्या भागातून कोणत्या उमेदवाराला किती पाठिंबा मिळाला, हे ओळखणे कठीण होऊ शकते. या प्रक्रियेमुळे निकालाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

३२ टेबलांवर उद्या मतमोजणी

उद्या, १९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाने ३२ टेबलांची व्यवस्था केली आहे. मतमोजणी पर्यवेक्षक आणि सहाय्यकांसह आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्यात येणार आहे. सर्वसाधारण मतदारसंघ, महिला प्रतिनिधी, इतर मागास प्रवर्ग तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गांनुसार मतमोजणीचे नियोजन करण्यात आले आहे.

मतमोजणीदरम्यान कोणत्या आघाडीला बहुमत मिळते आणि गोकुळ दूध संघाच्या नव्या संचालक मंडळात कोणाला संधी मिळते, हे स्पष्ट होणार आहे. सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची मानली जाणारी ही निवडणूक असल्याने उद्याच्या निकालाकडे दूध उत्पादकांसह राजकीय नेते आणि सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Ad 1
Tags: Hemant Kamble
Previous Post

सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

Related Posts

सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा
Blog

सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

October 18, 2026
3
भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
Blog

भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

October 18, 2026
0
महिलांना स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर
Blog

महिलांना स्वावलंबी, सक्षम व आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर

October 18, 2026
8
विद्यानगर, सेलू येथे जय अंबे नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा
Blog

विद्यानगर, सेलू येथे जय अंबे नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा

October 18, 2026
15
Blog

जपानमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकणार श्रीगोंद्याची लेक !

October 18, 2026
9
कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम
Blog

कालव्याची दुरुस्ती करूनही पाणी मिळेना; ग्रामस्थांची प्रतीक्षा कायम

October 18, 2026
19

ताज्या बातम्या

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

October 18, 2026
सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

सावरगावात माणुसकीचा झरा जिवंत; निलेश कापकर यांची स्वखर्चाने टँकरद्वारे जलसेवा

October 18, 2026
भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

भोये कुळ परिवाराचा देवकार्य सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

October 18, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In