• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी वडिलांना जन्मठेप; पीडितेला ५ लाखांची भरपाई

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 19, 2026
in Blog
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

बारामती सत्र न्यायालयाचा निकाल; सहआरोपी सावत्र आईची निर्दोष मुक्तता, बचाव पक्षातर्फे ॲड. अमोल सोनवणे यांचा युक्तिवाद

बारामती | प्रतिनिधी

RelatedPosts

स्वराज विद्यालयाच्या मुलींच्या कबड्डी संघाची जिल्ह्यात बाजी; प्रथम क्रमांक पटकावला!

सिंधुदुर्गातील बागायतदारांना माकडांपाठोपाठ शेकरूचा त्रास; फळबागांचे नुकसान वाढले

एटापल्ली पोलिसांची कारवाई; १४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याच्या प्रकरणात बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पीडितेच्या वडिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच पीडितेला पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. याच प्रकरणातील सहआरोपी सावत्र आईची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात आरोपी क्रमांक दोनच्या वतीने ॲड. अमोल सोनवणे यांनी बचाव पक्षाची बाजू मांडली.

वीटभट्टीवरील वास्तव्यातील घटना

या प्रकरणातील मुख्य आरोपी हा पीडितेचा वडील आहे. सन २०२२ मध्ये तो पीडिता आणि तिच्या सावत्र आईसह वीटभट्टीवर कामासाठी आला होता. २७ डिसेंबर २०२२ पासून वडिलांनी अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होता.

पीडिता गर्भवती असल्याचे समोर आल्यानंतर वीटभट्टी मालकाच्या पत्नीने तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पीडितेला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सावत्र आईविरुद्धही आरोप

तपासादरम्यान पीडितेने घडलेल्या प्रकाराची माहिती सावत्र आईला दिल्यानंतर तिनेही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि कथित गुन्ह्याला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपांवरून पोलिसांनी सावत्र आईला अटक करून तिच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.

ॲड. अमोल सोनवणे यांच्याकडून बचावाची बाजू

आरोपी क्रमांक दोन अर्थात सावत्र आईच्या वतीने ॲड. अमोल सोनवणे यांनी न्यायालयात बचाव पक्षाची बाजू मांडली. साक्षीदारांच्या उलटतपासणीदरम्यान तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे स्वरूप, कथित भूमिका आणि उपलब्ध पुरावे यांची छाननी करण्यात आली.

प्रत्येक आरोपीविरुद्धचे आरोप स्वतंत्रपणे तपासून ते कायदेशीर पुराव्यांच्या आधारे सिद्ध होणे आवश्यक असल्याचा मुद्दा बचाव पक्षाने मांडला. लेखी व तोंडी युक्तिवाद तसेच साक्षीदारांच्या साक्षींच्या परीक्षणानंतर न्यायालयाने सावत्र आईची निर्दोष मुक्तता केली.

१२ साक्षीदारांची साक्ष; पीडितेला पाच लाखांची भरपाई

या खटल्यात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुरावे आणि साक्षी विचारात घेऊन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी मुख्य आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय पीडितेला पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.

या खटल्यात ॲड. अमोल सोनवणे यांना सहकारी विधिज्ञ अविनाश जाधव, रितिक गायकवाड, राजरत्न ताकतोडे, वैभव झगडे, राहुल गिरमे, सागर खरात, ॲड. रवींद्र सोनवणे आणि लीगल एड पॅनेलचे ॲड. सुमित पाटील यांचे सहकार्य लाभले.

Ad 1
Tags: Amit Sonawane
Previous Post

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

Next Post

आलेगावात गोवंश कत्तलीच्या ठिकाणी पोलिसांचा छापा; दोघे ताब्यात, दोन गायींची सुटका

Related Posts

स्वराज विद्यालयाच्या मुलींच्या कबड्डी संघाची जिल्ह्यात बाजी; प्रथम क्रमांक पटकावला!
Blog

स्वराज विद्यालयाच्या मुलींच्या कबड्डी संघाची जिल्ह्यात बाजी; प्रथम क्रमांक पटकावला!

October 19, 2026
0
सिंधुदुर्गातील बागायतदारांना माकडांपाठोपाठ शेकरूचा त्रास; फळबागांचे नुकसान वाढले
Blog

सिंधुदुर्गातील बागायतदारांना माकडांपाठोपाठ शेकरूचा त्रास; फळबागांचे नुकसान वाढले

October 19, 2026
1
एटापल्ली पोलिसांची कारवाई; १४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
Blog

एटापल्ली पोलिसांची कारवाई; १४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

October 19, 2026
0
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहूमध्ये गोळीबार; अभिनेता सुखरूप, दोघे जखमी
Blog

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहूमध्ये गोळीबार; अभिनेता सुखरूप, दोघे जखमी

October 19, 2026
2
आलेगावात गोवंश कत्तलीच्या ठिकाणी पोलिसांचा छापा; दोघे ताब्यात, दोन गायींची सुटका
Blog

आलेगावात गोवंश कत्तलीच्या ठिकाणी पोलिसांचा छापा; दोघे ताब्यात, दोन गायींची सुटका

October 19, 2026
3
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!
Blog

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

October 18, 2026
33
Next Post
आलेगावात गोवंश कत्तलीच्या ठिकाणी पोलिसांचा छापा; दोघे ताब्यात, दोन गायींची सुटका

आलेगावात गोवंश कत्तलीच्या ठिकाणी पोलिसांचा छापा; दोघे ताब्यात, दोन गायींची सुटका

ताज्या बातम्या

स्वराज विद्यालयाच्या मुलींच्या कबड्डी संघाची जिल्ह्यात बाजी; प्रथम क्रमांक पटकावला!

स्वराज विद्यालयाच्या मुलींच्या कबड्डी संघाची जिल्ह्यात बाजी; प्रथम क्रमांक पटकावला!

October 19, 2026
सिंधुदुर्गातील बागायतदारांना माकडांपाठोपाठ शेकरूचा त्रास; फळबागांचे नुकसान वाढले

सिंधुदुर्गातील बागायतदारांना माकडांपाठोपाठ शेकरूचा त्रास; फळबागांचे नुकसान वाढले

October 19, 2026
मोहरीच्या जिल्हा परिषद शाळेत ‘मिशन आपुलकी’; विद्यार्थ्यांना मोफत दप्तर व खाऊचे वाटप

मोहरीच्या जिल्हा परिषद शाळेत ‘मिशन आपुलकी’; विद्यार्थ्यांना मोफत दप्तर व खाऊचे वाटप

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In