• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आलेगावात गोवंश कत्तलीच्या ठिकाणी पोलिसांचा छापा; दोघे ताब्यात, दोन गायींची सुटका

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 19, 2026
in Blog
0
आलेगावात गोवंश कत्तलीच्या ठिकाणी पोलिसांचा छापा; दोघे ताब्यात, दोन गायींची सुटका
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

पहाटे ४.२५ ते ५ वाजेदरम्यान चान्नी पोलिसांची कारवाई; महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

प्रतिनिधी

RelatedPosts

स्वराज विद्यालयाच्या मुलींच्या कबड्डी संघाची जिल्ह्यात बाजी; प्रथम क्रमांक पटकावला!

सिंधुदुर्गातील बागायतदारांना माकडांपाठोपाठ शेकरूचा त्रास; फळबागांचे नुकसान वाढले

एटापल्ली पोलिसांची कारवाई; १४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

आलेगाव : येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशाची कत्तल सुरू असल्याच्या माहितीवरून चान्नी पोलिसांनी रविवारी (दि. १८) पहाटे छापा टाकला. या कारवाईदरम्यान दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या दोन जिवंत गायींची सुटका करण्यात आली. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलेगाव येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशाची कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती चान्नी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पहाटे ४.२५ ते ५ वाजेदरम्यान संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी तेथे गोवंशाची कत्तल सुरू असल्याचे निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी शेख इब्राहिम शेख कळु आणि मोहम्मद हुजैफ शेख हसन (दोघेही रा. आलेगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून दोन जिवंत गायी ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

चान्नी पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधीन उपअधीक्षक धनराज देवजर्नकर यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस हवालदार रुपेश मोरे, राहुल वाघ, रवी घुगे तसेच पोलीस शिपाई शिवानंद स्वामी, शिवाजी आणि राम टेकाडे सहभागी होते.

या प्रकरणाचा पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहेत.

Ad 1
Tags: Pradip Tajne
Previous Post

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी वडिलांना जन्मठेप; पीडितेला ५ लाखांची भरपाई

Next Post

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहूमध्ये गोळीबार; अभिनेता सुखरूप, दोघे जखमी

Related Posts

स्वराज विद्यालयाच्या मुलींच्या कबड्डी संघाची जिल्ह्यात बाजी; प्रथम क्रमांक पटकावला!
Blog

स्वराज विद्यालयाच्या मुलींच्या कबड्डी संघाची जिल्ह्यात बाजी; प्रथम क्रमांक पटकावला!

October 19, 2026
5
सिंधुदुर्गातील बागायतदारांना माकडांपाठोपाठ शेकरूचा त्रास; फळबागांचे नुकसान वाढले
Blog

सिंधुदुर्गातील बागायतदारांना माकडांपाठोपाठ शेकरूचा त्रास; फळबागांचे नुकसान वाढले

October 19, 2026
2
एटापल्ली पोलिसांची कारवाई; १४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
Blog

एटापल्ली पोलिसांची कारवाई; १४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

October 19, 2026
0
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहूमध्ये गोळीबार; अभिनेता सुखरूप, दोघे जखमी
Blog

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहूमध्ये गोळीबार; अभिनेता सुखरूप, दोघे जखमी

October 19, 2026
3
Blog

अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी वडिलांना जन्मठेप; पीडितेला ५ लाखांची भरपाई

October 19, 2026
13
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!
Blog

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ९९.९६ टक्के विक्रमी मतदान; निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

October 18, 2026
33
Next Post
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहूमध्ये गोळीबार; अभिनेता सुखरूप, दोघे जखमी

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर जुहूमध्ये गोळीबार; अभिनेता सुखरूप, दोघे जखमी

ताज्या बातम्या

स्वराज विद्यालयाच्या मुलींच्या कबड्डी संघाची जिल्ह्यात बाजी; प्रथम क्रमांक पटकावला!

स्वराज विद्यालयाच्या मुलींच्या कबड्डी संघाची जिल्ह्यात बाजी; प्रथम क्रमांक पटकावला!

October 19, 2026
सिंधुदुर्गातील बागायतदारांना माकडांपाठोपाठ शेकरूचा त्रास; फळबागांचे नुकसान वाढले

सिंधुदुर्गातील बागायतदारांना माकडांपाठोपाठ शेकरूचा त्रास; फळबागांचे नुकसान वाढले

October 19, 2026
मोहरीच्या जिल्हा परिषद शाळेत ‘मिशन आपुलकी’; विद्यार्थ्यांना मोफत दप्तर व खाऊचे वाटप

मोहरीच्या जिल्हा परिषद शाळेत ‘मिशन आपुलकी’; विद्यार्थ्यांना मोफत दप्तर व खाऊचे वाटप

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In