• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नाशिक: शेअर ट्रेडिंगमधून कोट्यवधींच्या नफ्याचे आमिष दाखवून ९८.६० लाखांची फसवणूक

Pratik Tidke by Pratik Tidke
October 19, 2026
in Blog
0
नाशिक: शेअर ट्रेडिंगमधून कोट्यवधींच्या नफ्याचे आमिष दाखवून ९८.६० लाखांची फसवणूक
0
SHARES
6
VIEWS
Ad 1
Ad 1

नाशिक प्रतिनिधी- कुणाल दाणेच.

RelatedPosts

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

नाशिक। दि. १७ ऑक्टोबर २०२६:
शेअर बाजारात गुंतवणूक करून अल्पावधीत मोठा नफा मिळवण्याच्या आमिषाला बळी पडलेल्या एका नामांकित कंपनीच्या निवृत्त व्यवस्थापकाला तब्बल ९८ लाख ६० हजार रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. सोशल मीडियावरील शेअर ट्रेडिंग ग्रुपच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले असून, याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ जुलै ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संबंधित निवृत्त अधिकाऱ्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्हीआयपी शेअर ट्रेडिंग ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. ग्रुपमधील एका बनावट सदस्याने दररोज लाखो रुपयांचा नफा मिळत असल्याचे सांगत बनावट संदेश आणि नफ्याचे स्क्रीनशॉट पाठवले. दहा लाख रुपयांची गुंतवणूक करून २५ लाख रुपये कमावल्याचा दावाही करण्यात आला. इतर सदस्यांनाही मोठा नफा होत असल्याचे भासवून फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला.

यानंतर ग्रुपच्या ॲडमिनने फिर्यादीला बनावट ट्रेडिंग पोर्टलच्या लिंक पाठवल्या. सुरुवातीला त्यांनी काही हजार रुपयांची गुंतवणूक केली असता, संबंधित पोर्टलवरील डॅशबोर्डवर नफा झाल्याचे दाखवण्यात आले. त्यानंतर २५ हजार रुपयांच्या गुंतवणुकीवर ४० हजार रुपये झाल्याचे भासवण्यात आले. त्यापैकी २५ हजार रुपये प्रत्यक्ष बँक खात्यात जमा करण्यात आले. सुरुवातीला पैसे परत मिळाल्याने फिर्यादीचा संबंधित ट्रेडिंग योजनेवरील विश्वास अधिक दृढ झाला.
यानंतर परदेशी क्रमांकांवरून फोन करून मोठी गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवण्याची संधी असल्याचे सांगण्यात आले. या आमिषाला बळी पडून निवृत्त अधिकाऱ्याने आपली बचत टप्प्याटप्प्याने विविध ४६ बँक खात्यांमध्ये जमा केली. अशा प्रकारे एकूण ९८ लाख ६० हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले. दरम्यान, बनावट ट्रेडिंग पोर्टलवर त्यांच्या गुंतवणुकीवर दोन कोटी रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले.
मात्र, हा नफा प्रत्यक्षात मिळवून देण्याच्या आमिषातूनच फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

Ad 1
Previous Post

🚨🔥 सांगवी ग्रामपंचायतला जाहीर सवाल! नेमकं चाललंय तरी काय? 🔥🚨

Next Post

सावर्डे विद्यालयाच्या चार विद्यार्थिनींची चतुरंगच्या निवासी अभ्यासवर्गासाठी निवड

Related Posts

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न
Blog

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

October 19, 2026
1
जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी
Blog

जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

October 19, 2026
5
“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”
Blog

“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

October 19, 2026
2
🏆🎶 शेगाव येथे ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने संगीत खुर्ची स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न! 🎶🏆
Blog

🏆🎶 शेगाव येथे ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने संगीत खुर्ची स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न! 🎶🏆

October 19, 2026
0
सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान
Blog

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान

October 19, 2026
1
सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान
Blog

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान

October 19, 2026
0
Next Post
सावर्डे विद्यालयाच्या चार विद्यार्थिनींची चतुरंगच्या निवासी अभ्यासवर्गासाठी निवड

सावर्डे विद्यालयाच्या चार विद्यार्थिनींची चतुरंगच्या निवासी अभ्यासवर्गासाठी निवड

ताज्या बातम्या

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

October 19, 2026
जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

October 19, 2026
“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In