सेलू : जिल्हा परिषद सदस्य तथा सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय दादा रोडगे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मंठा येथील रेणुका माता मंदिराच्या यात्रेसाठी सिद्धनाथ बोरगाव येथील महिला भगिनींना दर्शनासाठी जाण्याकरिता स्कूल बसची व्यवस्था करून दिली.
गावातील सर्व माता-भगिनींना रेणुका मातेचे दर्शन घेता यावे, या उद्देशाने संजय दादा रोडगे व सविता संजय रोडगे यांनी केलेल्या या सहकार्यामुळे महिलांना यात्रेसाठी जाणे सोयीचे झाले.
या सामाजिक उपक्रमाबद्दल सिद्धनाथ बोरगाव गावातील महिला भगिनींनी संजय दादा रोडगे व सविता संजय रोडगे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. धार्मिक व सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गावातील नागरिकांना सहकार्य करण्याच्या या प्रयत्नाचे महिलांनी कौतुक केले.
सारथी महाराष्ट्राचा न्यूज











