• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अशोक विजयादशमीनिमित्त प्रा. अरुण बुंदेले यांची ‘दीक्षाभूमी एक क्रांतिभूमी’ कविता वाचकांसाठी प्रसिद्ध

Pratik Tidke by Pratik Tidke
October 19, 2026
in Blog
0
अशोक विजयादशमीनिमित्त प्रा. अरुण बुंदेले यांची ‘दीक्षाभूमी एक क्रांतिभूमी’ कविता वाचकांसाठी प्रसिद्ध
0
SHARES
1
VIEWS
Ad 1
Ad 1

दीक्षाभूमीच्या ऐतिहासिक महत्त्वासह बुद्ध, फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचारांचा कवितेतून जागर

अमरावती | सारथी महाराष्ट्राचा न्यूज

RelatedPosts

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी असलेल्या अशोक विजयादशमीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समाजसेवा गौरव पुरस्कार प्राप्त साहित्यिक व कवी प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले यांची ‘दीक्षाभूमी एक क्रांतिभूमी’ ही मुक्तछंदातील कविता वाचकांसाठी प्रकाशित करण्यात येत आहे.

नागपूर येथील दीक्षाभूमीचे ऐतिहासिक महत्त्व, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली धम्मदीक्षा आणि त्यातून समाजात निर्माण झालेल्या परिवर्तनाच्या प्रेरणेचे दर्शन या कवितेतून घडते. शोषित-वंचित समाजाला स्वाभिमान, समानता आणि मानवी हक्कांची जाणीव करून देणाऱ्या विचारांचा प्रभावी आविष्कार या कवितेत करण्यात आला आहे.

दीक्षाभूमी ही केवळ एक ऐतिहासिक वास्तू नसून ती सामाजिक परिवर्तनाची प्रेरणाभूमी असल्याची भावना कवीने शब्दबद्ध केली आहे. बुद्ध, फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे महत्त्व अधोरेखित करताना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा संदेश कवितेतून देण्यात आला आहे.

कविता : ‘दीक्षाभूमी एक क्रांतिभूमी’

नागपूरच्या दीक्षाभूमीवर
घडते तथागत गौतम बुद्ध
आणि संविधानाचे शिल्पकार
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांचे दर्शन

नागपूरच्या या दीक्षाभूमीवर
बाबासाहेबांनी लाखो अनुयायांना
बुद्ध धम्माची दीक्षा देऊन
इतिहास एका रात्रीत बदलला
शोषितांच्या जीवनातील तिमिराला
एक नवा प्रकाशमार्ग लाभला

ती फक्त एक जागा नाही,
ती तर एक महान क्रांतिभूमी आहे
शतकानुशतके सहन केलेल्या
वेदनेचा हुंकार आहे

बाबासाहेबांच्या धर्मांतराने
गुलामीच्या बेड्या क्षणात तुटल्या,
मानवतेचा महामंत्र सांगत,
धम्माच्या पाऊलखुणा येथेच उमटल्या.

जयभीमची गर्जना देत
दीक्षाभूमीवर येतो प्रत्येक बांधव
नवे परिवर्तनवादी बाबासाहेबांचे
विचार मनात रुजवायला

दीक्षाभूमीची ही पवित्र माती
शिकविते हक्कासाठी लढायला

थोरांच्या विचारांच्या पुस्तकांची
यात्रा म्हणजे दीक्षाभूमी
येथे आलेला प्रत्येक बांधव
फक्त ग्रंथ खरेदी करीत नाही
तर बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरांचा
क्रांतिकारी विचारही घेऊन जातो सोबत
स्वतःच्या शहर नि ग्रामामध्ये
परिवर्तनवादी विचार पेरायला

दीक्षाभूमी हीच खरी प्रेरणा
माणसाला माणूस म्हणून जगण्याची
स्वातंत्र्य, समता, बंधुता नि न्यायाची

तथागत गौतम बुद्धाला
करितो मी वंदन ॥
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना
करितो अभिवादन ॥

कवी परिचय :

प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार प्राप्त साहित्यिक व कवी
काँग्रेस नगर, अमरावती.

संपर्क : ८०८७७४८६०९

सारथी महाराष्ट्राचा न्यूज

Ad 1
Previous Post

जिवलग मित्र शैलेश गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव

Next Post

” जयहिंद येथे भव्य रक्तदान शिबीर”

Related Posts

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न
Blog

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

October 19, 2026
4
जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी
Blog

जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

October 19, 2026
14
“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”
Blog

“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

October 19, 2026
6
🏆🎶 शेगाव येथे ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने संगीत खुर्ची स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न! 🎶🏆
Blog

🏆🎶 शेगाव येथे ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने संगीत खुर्ची स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न! 🎶🏆

October 19, 2026
5
सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान
Blog

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान

October 19, 2026
2
सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान
Blog

सामाजिक बांधिलकीचा आदर्श! जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी कवठी येथे रक्तदान शिबिर; २५ दात्यांचे उत्स्फूर्त योगदान

October 19, 2026
0
Next Post
” जयहिंद येथे भव्य रक्तदान शिबीर”

" जयहिंद येथे भव्य रक्तदान शिबीर"

ताज्या बातम्या

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

औंढा येथे जमीअत उलामा हिंगोलीच्या वतीने शानदार जलसा-ए-आम व इनाम वितरण समारंभ संपन्न

October 19, 2026
जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

जाधववाडीत बोर्गस घरकुल व मस्टरच्या कामांची चौकशी करण्याची मागणी

October 19, 2026
“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

“भोंडल्याच्या फेरात संस्कृतीचा जागर, ‘नवदुर्गा उद्योजिकतेची शक्ती’तून महिला उद्योजिकांचा गौरव!”

October 19, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In